सालगड्याच्या गळ्याला कोयता लावून लुटले

By काशिनाथ वाघमारे | Published: July 14, 2023 09:10 PM2023-07-14T21:10:53+5:302023-07-14T21:11:03+5:30

महिलेच्या गळयातील चेन पळवली ..

farm lebor was robbed by putting a knife on his neck | सालगड्याच्या गळ्याला कोयता लावून लुटले

सालगड्याच्या गळ्याला कोयता लावून लुटले

googlenewsNext

सोलापूर : सालगडी पती-पत्नीला कोयता, चाकूचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सांगोला- एखतपूर रोडवर प्रकाश कांबळे यांच्या शेतातील वस्तीवर घडला.या लुटमारीत चोरट्याने गळ्यातील ७० हजार रुपयांचे १८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह रोख ४० हजार रुपये नेले. जाताना पती-पत्नीला घरात कोंडले, तसेच घराशेजारील वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे ११ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून तेथून धूम ठोकली. या घटनेत पती-पत्नी जखमी झाले आहेत. 

याबाबत, भीमराव रामभाऊ शिंदे (रा.सांगोला) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
 सांगोला-एखतपूर रोडवर भीमराव शिंदे व रत्नमाला शिंदे हे मजूर दांपत्य प्रकाश कांबळे यांच्या सांगोला रोडवर शेतात सालगडी म्हणून कामास आहेत. गुरुवार, १३ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास भीमराव शिंदे घराच्या बाहेर ओट्यावर झोपले होते, तर पत्नी घरामध्ये दरवाजा बंद करून झोपली होती. 

दरम्यान, शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास एकाने गळ्याला चाकू लावला. जर आरडाओरडा केला तर जीवे मारीन, असे धमकावत हातातील उलट्या कोयत्याने त्यांच्या पाठीवर मारहाण केल्यामुळे घाबरून ते गप्प बसले. त्यावेळी दोघांनी त्यांच्या घराच्या दरवाजाला धक्के दिल्यामुळे दरवाजाच्या आतील कडी तुटताच तिघेजण घरात घुसले. पत्नीस दमदाटी करत दागिन्यासह रोख ४० हजार रुपये असा सुमारे १ लाख ११ रुपयांचा ऐवज चोरी करून घराबाहेर आले.

महिलेच्या गळयातील चेन पळवली ..
जाताना चोरटे त्यांच्या जवळच राहणारे रवींद्र गुळमिरे यांच्या घराच्या दरवाजाची आतून लावलेली कडी काढून घरात प्रवेश केला. आई शीलादेवी गुळमिरे यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून तेथून धूम ठोकली.

Web Title: farm lebor was robbed by putting a knife on his neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.