भुईमुगाला रात्री पाणी देताना सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

By दिपक दुपारगुडे | Published: April 22, 2023 04:59 PM2023-04-22T16:59:46+5:302023-04-22T17:00:30+5:30

सापाने दंश केल्याने तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Farmer dies of snakebite while watering groundnuts at night | भुईमुगाला रात्री पाणी देताना सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

भुईमुगाला रात्री पाणी देताना सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

सोलापूर : भुईमूग पिकाला पाणी देत असताना सापाने दंश केल्याने तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, माढा तालुक्यातील अरण येथील शेतकरी नागनाथ पंडित सुर्वे (वय ४२, रा. अरण, ता. माढा) हे गुरुवारी रात्री शेतामध्ये भुईमुगाच्या पिकाला पाणी देत होते. यावेळी भुईमुगाच्या पिकात दारं मोडताना नागनाथ यांना भुईमुगात एका सापाने दंश केला. दरम्यान रात्रीची साडेनऊ वाजले होते. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले असता शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Farmer dies of snakebite while watering groundnuts at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी