शेतकऱ्याने लंपी रोगावर शोधला उपाय; जनावरांसाठी बनवलं पीपीई किट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:04 PM2023-10-17T12:04:18+5:302023-10-17T12:04:29+5:30
कोरोना काळात पीपीई किट घालून काम करणारे आरोग्यसेवक आपण पहिलेच असतील.
राज्यातील गेल्या अनेक दिवसांपासून लंपी रोगाने थैमान घातलं आहे. यामुळे पशु पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रोगामुळे राज्यभरातील जनावरांची अनेक आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात येत आहेत. मात्र, या संसर्गजन्य आजारावर सोलापुराच्या एका शेतकऱ्याने शक्कल लढवत उपाय काढला आहे.
कोरोना काळात पीपीई किट घालून काम करणारे आरोग्यसेवक आपण पहिलेच असतील. आता लंपीपासून खबरदारी घेण्यासाठी थेट जनावरांसाठी पीपीई किट बनवण्याची किमया सोलापुरातील एका शेतकऱ्यांने केली आहे. सांगोला तालुक्यातील महूदचे शेतकरी जितेंद्र बाजारे यांनी हा पीपीई किट तयार केल आहे. या पीपीई किटमुळे पशुपालकांची चिंता ही काही अंशी कमी होणार आहे.
लंपीपासून खबरदारी घेण्यासाठी थेट जनावरांसाठी पीपीई किट बनवण्याची किमया सोलापुरातील एका शेतकऱ्यांने केली आहे. pic.twitter.com/pNLCDXA500
— Lokmat (@lokmat) October 17, 2023