शेतकरी सुखावला; नीरेचे पाणी आले भीमा नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:10 PM2017-08-03T13:10:52+5:302017-08-03T13:12:12+5:30
माळीनगर दि ३ : वीर धरण लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने वीर धरणातून ४ हजार ५०० क्युसेक्सने सोडण्यात आलेले पाणी माळशिरस तालुक्यात आले़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
माळीनगर दि ३ : वीर धरण लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वीर धरणातून ४ हजार ५०० क्युसेक्सने सोडण्यात आलेले पाणी सोमवारी रात्री १२ नंतर माळशिरस तालुक्यात आले़ २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे पाणी गणेशगाव बंधाºयात आले होते रात्री ते संगम येथे भीमा नदीत पोहोचले आहे़
उजनी धरणातून भीमा नदीत पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे़ या पाण्यानेही २ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता संगम येथे माळशिरस तालुक्यात प्रवेश केला़ वीर धरणाच्या व उजनी धरणातून पाणी आल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत़ त्यामुळे आता नदीकाठ परिसरातील गावांमध्ये ऊस लागवडीला वेग आला आहे़
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाऊस झाला नाही़ त्यामुळे शेतकरी चिंतेत होता़ नीरा उजवा कालव्याला सोडलेल्या पाण्याने करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे़ त्यात आता दोन्ही नद्यांना पाणी आल्याने शेतीची कामे पूर्ण करण्याची शेतकºयांची लगबग सुरू आहे़ भीमा नदीत पाणी आल्याचे तालुक्यातून स्वागत होत आहे.
----------------
दोन्ही नद्यांना पाणी आल्यामुळे नदीकाठच्या शेतकºयांना याचा लाभ होईल, पण ऊस लागवड करण्यासाठी चांगला पाऊस होणे गरजेचे आहे़ अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.
- मोहन लोंढे,
माजी संचालक, सहकार महर्षी साखर कारखाना