सोलापूर जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा पाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:13 AM2017-08-14T05:13:43+5:302017-08-14T05:14:31+5:30

साखर कारखानदारीसाठी ओळखल्या जाणाºया सोलापूरमध्ये सुबत्ता दिसत असली तरी जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्यांचा पाश आता लपून राहिलेला नाही.

Farmer suicides in Solapur district | सोलापूर जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा पाश

सोलापूर जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा पाश

Next

गोपालकृष्ण मांडवकर ।
सोलापूर : साखर कारखानदारीसाठी ओळखल्या जाणाºया सोलापूरमध्ये सुबत्ता दिसत असली तरी जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्यांचा पाश आता लपून राहिलेला नाही. साडेचार वर्षांत जिल्ह्यात तब्बल १०९ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्यातील फक्त ११ आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत. त्यामुळे ९८ शेतकरी कुटुंबात दु:खाचा अंधारच आहे.
जिल्ह्यात ३५ साखर कारखाने आहेत. नव्याने ३ प्रस्तावित आहेत. सर्वाधिक ४७ आत्महत्या २०१५ मध्ये झाल्या. शेतीच्या वित्तपुरवठ्यासाठी बँकांशिवाय सावकारांवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. नापिकी, अपुरा पाऊस आणि उत्पादनात घट यामुळे शेतकºयांची स्थिती खालावत चालल्याचे दिसत आहे.
नापिकी, कर्जबाजारीपणा, राष्टÑीयीकृत बँका अथवा मान्यताप्राप्त सावकारी कर्ज असल्याचे सिद्ध झाल्यास आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या वारसांना सरकारकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. कृषी विभाग आणि अन्य योजनांमध्ये पीडित कुटुंबाला प्राधान्य द्यावे, अशाही सरकारच्या सूचना आहेत.
शेतकरी आत्महत्या
वर्ष आत्महत्या मदतीस पात्र अपात्र
२०१३ १६ २ १४
२०१४ ११ १ १०
२०१५ ४७ ३ ४४
२०१६ १९ १ १८
२०१७ १६ ४ १२
एकूण १०९ ११ ९८

Web Title: Farmer suicides in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.