दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून केले आंदोलन
By Appasaheb.patil | Published: July 29, 2023 10:47 AM2023-07-29T10:47:58+5:302023-07-29T10:48:13+5:30
राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे
सोलापूर - शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी शनिवारी सकाळी सरकोली (ता. पंढरपूर) येथे रयत क्रांती संघटना व दुध उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने दुध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आले.
यावेळी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. एका बाजूला राज्य सरकारने ३/५ व ८/१५ ला २५ रूपये ऐवजी ३४ रूपये हमी भाव केला. राज्य सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम केले परंतु राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघाने जाणुन बुजून रिवस दुरात २० पैसे ऐवजी १ रूपया वाढविला. वाहतूक दर वाढविला.
या दुध उत्पादक शेतकऱ्यांना २८,२९ रूपयेच्यावर दर मिळेना, राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे, म्हणून रयत क्रांती संघटना व दूध उत्पादक संघटनांनी आज दुध ओतून खाजगी व सहकारी दूध संचालकालच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी दीपक भोसले यांच्यासह अन्य दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.