वीज जोडणीसाठी शेतकरी आक्रमक; बावी पाटीवर रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:21 AM2021-03-25T04:21:47+5:302021-03-25T04:21:47+5:30
सोमवारीच शेतकरी संघटनेने या आंदोलनाबाबत प्रशासनात निवेदन दिले होते. तरीही या आंदोलनाकडे वीज वितरणचा कोणताही जबाबदार अधिकारी न फिरकल्याने ...
सोमवारीच शेतकरी संघटनेने या आंदोलनाबाबत प्रशासनात निवेदन दिले होते. तरीही या आंदोलनाकडे वीज वितरणचा कोणताही जबाबदार अधिकारी न फिरकल्याने आंदोलक आक्रमक झाले. शेवटी बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार रफीक शेख, हवालदार रियाज शेख राजेंद्र मंगरुळे, कांतीलाल लाड, प्रदीप केसरे यांनी परिस्थिती नियंत्रित केली.
यानंतर आंदोलकांपैकी ३७ प्रमूख शेतकऱ्यांचा मोर्चा सहाय्यक अभियंत्याच्या बार्शी येथील कार्यालयात धडकला. यानंतर वीज जोडण्या पूर्ववत करण्यासाठी किती बील भरावे यासाठी बावी ( आ. ) येथील खंडोबा मंदीरात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे ठरले व आंदोलक परत गेले.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत भोसले, अशोक आगलावे, मुसा मुलाणी, राहुल आगलावे, अमोल आगलावे, आप्पासाहेब आगलावे, अमीन शेख, सचिन आगलावे, अमोल लोंढे, अरविंद करडे, आबासाहेब करडे, सुरेश पागे, विनोद आगलावे, सुरेश लोंढे, नानासाहेब गुंड, अतुल जाधव, संतोष जाधव, हनुमंत पवार, बाळू पवार,नवनाथ काळे, सदानंद आगलावे, बालाजी लोंढे, कविश्वर आगलावे, दिलीप आगलावे, दयानंद आगलावे, धनाजी आगलावे, प्रशांत जाधव, समाधान पिसाळ, प्रमोद आगलावे, अमर आगलावे, बालाजी पाटील, गणेश पाटील, शिवाजी धुमाळ, राजेंद्र फोपले यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.