शेतकरी आक्रमक, वाशिंबेत वीज केंद्राला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:11+5:302021-08-24T04:27:11+5:30

वाशिंबे परिसरातील दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी आज (सोमवारी) सब स्टेशन बंद करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. आम्ही वीज बिल भरू ...

Farmers aggressively avoid hitting the power station in Washimbet | शेतकरी आक्रमक, वाशिंबेत वीज केंद्राला ठोकले टाळे

शेतकरी आक्रमक, वाशिंबेत वीज केंद्राला ठोकले टाळे

Next

वाशिंबे परिसरातील दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी आज (सोमवारी) सब स्टेशन बंद करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. आम्ही वीज बिल भरू शकत नाही, त्यामुळे पूर्णपणे लाईट बंद राहू द्या, ज्यावेळी आमच्याकडे पैसे येतील, तेव्हाच भरू व नंतरच लाईट चालू करा, तोपर्यंत आम्ही अंधारातच राहू, असे ठणकावून सांगितले.

सध्या कोणत्याही शेतमालाला भाव नाही. उसाची एफ.आर.पी येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विकलांग झाला आहे. त्यामुळे आम्ही वीजबिल भरू शकत नाही. वीजबिल भरेपर्यंत लाईट सोडू नका, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पर्यायाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वाशिंबे उपकेंद्रावरील गावठाण फिडरसह शेतीपंपाचे फिडर बंद ठेवले आहेत. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब झोळ, माजी सरपंच प्रताप झोळ आदी सहभागी झाले होते.

.........

फोटो ओळ

वाशिंबे येथील वीज केंद्र बंद करताना शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.

Web Title: Farmers aggressively avoid hitting the power station in Washimbet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.