शेतकरी आंदोलन.. पंतप्रधानांनी कायदा बदलायला हवा: पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:14+5:302020-12-05T04:48:14+5:30
ना. पटोले हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. परतीच्या प्रवासात त्यांनी टेंभुर्णी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत आ. बबनराव शिंदे ...
ना. पटोले हे पंढरपूर दौऱ्यावर आले होते. परतीच्या प्रवासात त्यांनी टेंभुर्णी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत आ. बबनराव शिंदे हेही होते.
पुढे बोलताना ना. पटोले म्हणाले की, देशातील लाखो शेतकरी कायदा बदलण्यासाठी दबाव टाकत आहेत. पण सरकार लक्ष देत नाही. नोटाबंदीप्रमाणे शेतकरी कायदाही फसलेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिक्षक व पदवीधर मतदारसंघात ५६ वर्षांनंतर सत्तांतर घडले आहे. याविषयी ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये कोणीही माझी जहागिरी आहे, असे समजायचे नाही. या बदलाने देशाच्या राजकारणात मोठा संदेश दिला आहे, असे सांगितले.
पुतळे पेटवणे चुकीचे
-
उद्योगपती अदानी, अंबानी यांचे पुतळे आंदोलनातील लोक पेटवतात. हे देशात पहिले उदाहरण आहे. पहिल्यांदा हे घडत आहे. हे बरोबर नाही. लोकांच्या भावना हा संशोधनाचा विषय आहे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
फोटो ओळी :
०४टेंभुर्णी-पटोले
टेंभुर्णी येथील पत्रकार परिषदेत बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सोबत आ. बबनराव शिंदे, डॉ राहुल पाटील आदी.
----