शेतकरी कर्जबाजारी होतोय; कांद्याचा हमीभाव जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक
By Appasaheb.patil | Published: March 2, 2023 03:57 PM2023-03-02T15:57:20+5:302023-03-02T15:58:22+5:30
"यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे."
सोलापूर : सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक चांगली आहे. परंतू दुदैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी प्रति क्विंटल १५०० रूपचे खर्च येतो, परंतू आज बाजारात ३०० ते ५०० रूपये क्विंटल दराने कांदा विकला जातो आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होत आहे. शासनाच्यावतीने शेतऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार रूपये अनुदान द्यावे आणि यापुढे कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबतचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना देण्यात आले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राजकुमार बिराजदार, विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, तालुका उपाध्यक्ष पिंटू गावडे, तिपण्णा घोडके, विलास पाटील, तालुका कार्याध्यक्ष काशिनाथ निंबाळ, तालुका प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ घोडके, तालुका युवक आघाडीचे उपाध्यक्ष बिरु बंदिछोडे, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष विशाल निंबाळ, सलगर जिल्हा परिषद गट प्रमुख रेवणसिध्द शेरी, वाहतूक आघाडीचे तालुका अध्यक्ष शंकर कोकरे, देवेंद्र नारायणकर,नागू शिरोळे, शिवलिंग गायकवाड यांच्या सह आदी उपस्थित होते.