शेतकरी संघटनेचे अक्कलकोट येथे दुध, कांदा फेकून रास्ता रोको आंदोलन, शेतकरी आक्रमक
By Admin | Published: June 8, 2017 03:34 PM2017-06-08T15:34:35+5:302017-06-08T15:34:35+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : संपूर्ण कर्जमाफी हवी व शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी निषेधार्थ अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी सकाळी रस्त्यावर दुध व कांदा फेकून रास्तारोको करण्यात आले.
राज्यामध्ये सरकारच्या विरोधात विविध प्रकारचे आंदोलन गेल्या १ जूनपासून चालू आहे. या आंदोलनाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. शेतकऱ्यांया बाबतीत सरकारकडून ठोस पाऊल उचलण्यात येत नसल्याने राज्यभर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करत आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने एस.टी. स्टॅन्ड समोरील रस्त्यावर शेतकऱ्यांनी दुध व कांदा फेकून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्य काळात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी रास्तारोको प्रसंगी दिले.
या आंदोलनास्थळी तहसीलदार स्नेहा उबाळे यांनी भेट देऊन आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनमध्ये अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक बाबासाहेब पाटील, सद्धाम शेरीकर, मल्लीनाथ भासागी, शिवराज स्वामी, महादेव बिराजदार, शिवशरण बिराजदार, सिकंदर जमादार, सिद्धराम जाधव, धर्मराज गुंजले, शिवलिंग गायकवाड, शाहबाज बागवान, हुशेन कुरेशी, सुनील खवळे, समाधान होटकर, किशोर सिद्धे, अशेक ढोणे, श्रीधर कुलकर्णी, शिवानंद पाटील, रवी गायकवाड व नंदकुमार स्वामी, सुधाकर वाकडे, गुणवंत धर्मसाले, पंचय्या स्वामी, नासाप्पा नंदीवाले, विश्वनाथ बिराजदार आदीसह बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. आंदोलनाच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनखाली पो.नि. सुरज बंडगर यांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.