शेतकऱ्यांनी बार्शी-धाराशिव रस्ता रोखला; जाणून घ्या आंदोलनाचे कारण ?
By Appasaheb.patil | Published: June 7, 2024 06:22 PM2024-06-07T18:22:37+5:302024-06-07T18:24:20+5:30
सोलापूर : सन २०२३ मधील खरीप व रब्बीचा उर्वरित पीकविमा, दुष्काळ निधी, अनुदान, येलो मोझॅकची भरपाई व उर्वरित शेतकऱ्यांचे ...
सोलापूर: सन २०२३ मधील खरीप व रब्बीचा उर्वरित पीकविमा, दुष्काळ निधी, अनुदान, येलो मोझॅकची भरपाई व उर्वरित शेतकऱ्यांचे कांदा अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी चिखर्डे (ता.बार्शी) येथे आंदोलन करीत बार्शी-धाराशिव रस्ता रोखला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व तालुकाध्यक्ष शरद भालेकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी दिगंबर रणखांब, दत्तात्रय पाचकवडे, संतोष दळवी, प्रदीप कोंढारे, जीवन गावडे, रघुनाथ कोंढारे, अमर पाटील, दीपक कोंढारे, अशोक पाटील, तुळशीदास चव्हाण, पोपट कोंढारे, दत्तात्रय जगताप, सौदागर जाधव, दत्तात्रय जाधव, बिभीषण शिंदे, मोहन कोंढारे, ज्ञानेश्वर कोंढारे, स्वप्निल कोंढारे, रामहरी पेजगुडे, काकासाहेब बळी, तुषार सवणे, सुमंत तुपेरे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
जर शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शेतकरी सरकारची दानादान उडवतील, असा खणखणीत इशाराही शंकर गायकवाड यांनी आंदोलनाप्रसंगी दिला. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन बार्शीच्या अप्पर तहसीलदार वृषाली केसकर व नारीच्या मंडळाधिकारी, मेघना राजपूत यांनी स्वीकारले. या आंदोलनावेळी पांगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.