चपळगाव मंडलातील शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:21 AM2021-03-26T04:21:47+5:302021-03-26T04:21:47+5:30

चपळगाव मंडलातील चपळगावसह डोंबरजवळगे, नन्हेगाव, सिंदखेड, मोट्याळ, चुंगी, पितापूर, चपळगाववाडी, कुरनूर, बावकरवाडी, दर्शनाळ, बऱ्हाणपूर, बोरेगाव यासह इतर गावांतील बहुतांश ...

Farmers in Chapalgaon Mandal waiting for crop insurance | चपळगाव मंडलातील शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत

चपळगाव मंडलातील शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत

Next

चपळगाव मंडलातील चपळगावसह डोंबरजवळगे, नन्हेगाव, सिंदखेड, मोट्याळ, चुंगी, पितापूर, चपळगाववाडी, कुरनूर, बावकरवाडी, दर्शनाळ, बऱ्हाणपूर, बोरेगाव यासह इतर गावांतील बहुतांश शेतकरी खरिपातील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पीकविमा कंपनीकडून पंचनामे करण्यात आले, परंतु त्याची रक्कम मिळाली नाही. न्यायही मिळाला नाही. यावेळी कृषी उपसंचालक रवींद्र माने, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, कृषी अधिकारी रामचंद्र माळी, सिद्धाराम भंडारकवठे, शशीकांत लादे, सदानंद भोसले, खंडू कोरे, प्रशांत पाटील, उत्तम भगत उपस्थित होते.

चपळगाव मंडलातील बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. पीकविमा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा व तालुका कृषी अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा केला आहे, असे सरपंच उमेश पाटील यांनी सांगितले.

कोट ::::::

चपळगाव मंडलातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विमा कंपनीशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षकांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी मागवून पाठपुरावा करणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर व जिल्हा कृषी अधिकारी जयवंत कवडे यांनी सांगितले.

Web Title: Farmers in Chapalgaon Mandal waiting for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.