राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प, दिलेले पैसेही घेतले परत, हिवाळी अधिवेशनानंतर शासनाने घेतला हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 10:56 AM2018-02-01T10:56:55+5:302018-02-01T10:58:08+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत.

Farmers' debt waiver process has been withdrawn, given the money returned, and after the winter session | राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प, दिलेले पैसेही घेतले परत, हिवाळी अधिवेशनानंतर शासनाने घेतला हात आखडता

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प, दिलेले पैसेही घेतले परत, हिवाळी अधिवेशनानंतर शासनाने घेतला हात आखडता

Next
ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लकसध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र


अरुण बारसकर 
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर घाईने शेतकºयांच्या यादीसोबत दिलेले पैसेही शिल्लक असल्याचे कारण पुढे करून शासन जमा करून घेतले आहेत. सध्या पात्र शेतकºयांच्याही खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे पैसे नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया ठप्प झाली आहे.
मोठा गाजावाजा झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पैशाची तरतूद असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पात्र शेतकºयांसाठीही बँकांना पैसे दिले जात नाहीत. २९ जानेवारीपर्यंत राज्यात एकूण ३० लाख ८६ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. शासनाने आतापर्यंत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा केली असून त्यातील त्रुटी असलेल्या शेतकºयांच्या त्रुटी दूर करुन अचूक याद्याही शासनाकडे बँकांनी दिल्या आहेत. मात्र बँकांकडे पैसे नसल्याने पात्र असलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करता येत नाहीत. हिवाळी अधिवेशनादरम्यान घाईने जिल्हा बँका तसेच राष्टÑीय बँकांना १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची तब्बल ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांची यादी दिली होती. प्रत्यक्षात आवश्यक रक्कम दिली नाही. त्यामुळे पात्र शेतकºयांची यादी असूनही तसेच दीड लाखावरील रक्कम जमा केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. 
---------------
अचूक याद्याही लटकल्या 
- राज्यातील ३४ जिल्हा बँका तसेच राष्टÑीयीकृत बँकांना दिलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ४२ लाख ४८ हजार ९४३ शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी १८ हजार ७७२ कोटी ३६ लाख ७३ हजार ४४० रुपयांची आवश्यकता आहे. 
--------------------
-‘ग्रीन’ यादी तपासणीनंतर पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले. यामध्ये दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, नियमित कर्ज भरणारे व दीड लाखावरील रक्कम कर्ज खात्यावर भरणाºया शेतकºयांचा समावेश आहे.
- ग्रीन यादीतील त्रुटी निघालेल्या शेतकºयांच्या याद्या अचूक करुन त्या शासनाकडे पाठविल्या आहेत. या यादीतील शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी शासन पैसेही देत नाही व ही पात्र यादी बँकांनाही देत नाही. 
- राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी (५६ लाख ५९ हजार कुटुंबांनी) कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले. 
- अर्ज भरलेल्या ७७ लाख २९ हजार शेतकºयांपैकी निकषानुसार कर्जमाफीला ६८ लाख ९० हजार खातेदार पात्र झाले आहेत. 
--------------------------
सोलापूर जिल्हा बँकेने ‘ग्रीन’ यादी तपासणी करुन १८ हजार ३७० पात्र शेतकºयांची तसेच ‘यलो’ यादीच्या तपासणीत पात्र झालेल्या ३२२४ शेतकºयांची पात्र यादी शासनाला पाठवली आहे. बँकेकडे कर्जमाफीचे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक असले तरी तीही रक्कम परवानगी नसल्याने जमा करता येत नाहीत. 
- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

Web Title: Farmers' debt waiver process has been withdrawn, given the money returned, and after the winter session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.