मंगळवेढा मार्केट कमिटीत शेतकरी आनंदी; डाळिंबला मिळाला ५११ रुपये प्रतिकिलो दर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2021 09:00 AM2021-11-05T09:00:31+5:302021-11-05T09:01:03+5:30

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढामधील डाळिंब सौदे लिलावामध्ये भाळवणी (तालुका मंगळवेढा) येथील शेतकऱ्याला भगवा जातीच्या डाळिंबला एक किलोला ५११/- ...

Farmers happy on Mars Market Committee; Pomegranate got Rs 511 per kg | मंगळवेढा मार्केट कमिटीत शेतकरी आनंदी; डाळिंबला मिळाला ५११ रुपये प्रतिकिलो दर 

मंगळवेढा मार्केट कमिटीत शेतकरी आनंदी; डाळिंबला मिळाला ५११ रुपये प्रतिकिलो दर 

Next

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढामधील डाळिंब सौदे लिलावामध्ये भाळवणी (तालुका मंगळवेढा) येथील शेतकऱ्याला भगवा जातीच्या डाळिंबला एक किलोला ५११/- रुपये असा उच्चांकी दर मिळाला.

दरम्यान, बुधवार ३ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती सौदे लिलावामध्ये हणमंत काळे यांच्या काळे आणि कंपनी आडत दुकानी भाळवणी तालुका मंगळवेढा येथील शेतकरी अण्णासाहेब मोरे यांच्या भगवा डाळींबला पटना बिहार मधील खरेदीदार रामलाल या व्यापाऱ्यांनी ५११ रुपये किलो दराने खरेदी केला.


 यावेळी बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते डाळिंब उत्पादक शेतकरी अण्णासाहेब मोरे यांचा हार, फेटा, शाल, देऊन सत्कार करण्यात आला. बाजार समिती संचालक मंडळाने डाळिंब लिलाव सुरू करून २ वर्षे पूर्ण झाली असून सदरील कालावधीत २ लाख ७१ हजार डांळीब कँरेटची आवक झाली असुन २९ कोटी ५२ लाख रुपयांची विक्री झालेली आहे.

दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यांमध्ये शेतकरी आता मोठ्या प्रमाणात फळबांगाची लागवड करू लागला आहे. परंतु शेतक-याला आपला माल विक्रीसाठी इतर ठिकाणी जावे लागत होते परंतु मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीने डाळींब सौदे लिलाव सुरू केलेपासुन या ठिकाणी कलकत्ता, नागपुर, राजस्थान बिहार यासह अनेक राज्यामधुन व्यापारी खरेदीसाठी येउ लागले आहेत. यामुळे शेतक-यांच्या डाळींबाला दर ही चांगला मिळु लागला आहे.


सभापती सोमनाथ आवताडे यांनी पदभार घेतलेपासुन संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांनसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांच्या याच कामाची दखल घेऊन राज्यस्तरीय उत्कृष्ट चेअरमन म्हणून पुरस्कार मिळाला आहे. बाजार समितीने शेतक-यांच्या मालाला विक्रीसाठी दररोज दुपारी ४ वाजता सौदे लिलाव सुरू केले आहेत.

Web Title: Farmers happy on Mars Market Committee; Pomegranate got Rs 511 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.