टॉवरवर चढून शेतकऱ्याचे उपोषण; पंढरपूर प्रांत कार्यालयातील प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 01:30 PM2021-01-25T13:30:45+5:302021-01-25T13:37:19+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Farmers' hunger strike by climbing the tower; Administration rush to Pandharpur provincial office | टॉवरवर चढून शेतकऱ्याचे उपोषण; पंढरपूर प्रांत कार्यालयातील प्रशासनाची धावपळ

टॉवरवर चढून शेतकऱ्याचे उपोषण; पंढरपूर प्रांत कार्यालयातील प्रशासनाची धावपळ

Next

पंढरपूर : जिल्हाधिकारी व न्यायालयाने हुकूमनाम्यामध्ये एक वादी व सहा प्रतिवादी असताना कुणाचा वाटप तक्ता तयार करण्याबाबत व नोंद देण्याबाबत आदेश केला होता. या आदेशाची नक्कल मिळावी, या मागणीसाठी पंढरपूर प्रांत कार्यालयातील टॉवरवर चढून कुबेर चिमाजी घाडगे (मु. पो. देगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर) या शेतकर्याने आमरण उपोषण सुरू केले आहे.

सोमवारी सकाळी शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे हे जवळपास १०० फूट टॉवरवर चढले आहेत, सोबत त्यांनी मोबाईल व पिशवी ठेवली आहे. अचानक शेतकरी टॉवरवर चढल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.  तत्काळ तहसीलदार विवेक साळुंखे, सपोनि. राजेंद्र मुगदुम पोहोचले. प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी कुबेर चिमाजी घाडगे यांच्याशी उपोषण स्थगित करण्यासंदर्भात फोनद्वारे विनवणी केली आहे. त्याचबरोबर प्रांत पोलीस बंदोबस्त व अग्निशमन वाहन ठेवण्यात आले आहे.

Web Title: Farmers' hunger strike by climbing the tower; Administration rush to Pandharpur provincial office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.