दुष्काळाला कंटाळून मंगळवेढा तालुक्यातील शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:06 PM2018-11-13T12:06:40+5:302018-11-13T12:08:26+5:30
नंदेश्वर : दुष्काळ व कर्जाला कंटाळून आंधळगांव पाटकळ रोडवर असलेल्या रस्त्याजवळ पाठकळ (ता .मंगळवेढा) येथील भारत आप्पा गडदे (वय ...
नंदेश्वर : दुष्काळ व कर्जाला कंटाळून आंधळगांव पाटकळ रोडवर असलेल्या रस्त्याजवळ पाठकळ (ता .मंगळवेढा) येथील भारत आप्पा गडदे (वय ६५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली़ याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील आत्महत्येची ही चौथी घटना आहे यापूर्वी निंबोणी येथील दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तर पडोळकरवाडी येथील एकाने गेल्या आठवड्यापूर्वीच आत्महत्या केली़ मंगळवेढा तालुक्यात शेतकºयांमध्ये आत्महत्या करण्याचे लोन वाढत आहे याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
आत्महत्याग्रस्त भारत गडदे यांची पाठखळ येथे शेती आहे़ मागील दोन ते तीन वर्षापासून या भागात दुष्काळ पडत आहे़ शेतीच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली आहे़ त्यामुळे बँकेतून काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत़ शिवाय जनावरांना चारा नाही, पाण्याअभावी पिके जळून गेली़ पुढील दहा महिने कसे काढायचे या विवंचनेतून भारत गडदे या शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.