बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोहोळ येथे शेतकऱ्यांचा मोर्चा

By Appasaheb.patil | Published: May 22, 2023 02:30 PM2023-05-22T14:30:25+5:302023-05-22T14:32:09+5:30

जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता साळे यांनी लवकरच बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले.

Farmers march in Mohol to demand release of water in dam in Mohol | बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोहोळ येथे शेतकऱ्यांचा मोर्चा

बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोहोळ येथे शेतकऱ्यांचा मोर्चा

googlenewsNext

सोलापूर : मोहोळ येथे मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील अनगर, बोपले, मलिकपेठ,आष्टे व शिरापूर या बंधाऱ्यात पाणी न सोडणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ मोहोळ तहसील कार्यालयावर माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार यशवंत माने व लोकनेते शुगर चे चेअरमन मा बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांच्या समवेत मोहोळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आली.

यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता साळे यांनी लवकरच बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात अनगर, बोपले, मलिकपेठ, आष्टे, शिरापूर भागातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. भर उन्हातही मोर्चाला गर्दी मोठी होती. मोर्चामुळे मोहोळ शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

Web Title: Farmers march in Mohol to demand release of water in dam in Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.