सोयाबीन, तूर आणि कांद्याची नासलेली पिकं घेऊन शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:36 PM2020-10-19T12:36:37+5:302020-10-19T12:36:44+5:30

मुख्यमंत्र्यांनी ऐकली शेतकºयांची गाºहाणी; बोरी नदीच्या पुलावर मुख्यमंत्र्यांचा शेतकºयांचा संवाद

The farmers met the Chief Minister with the lost crops of soybean, tur and onion | सोयाबीन, तूर आणि कांद्याची नासलेली पिकं घेऊन शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटले

सोयाबीन, तूर आणि कांद्याची नासलेली पिकं घेऊन शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटले

Next

सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टग्रस्त सोलापूरच्या दौºयावर आले आहेत. मुख्यमंत्री येणार म्हणून अतिवृष्टीने पिचलेल्या शेतकºयांनीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. सोयाबीन, तूर आणि कांद्याची नासलेली रोपं घेऊनच शेतकºयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत बोरी नदीवरील पुलावरून आमची विचारपूस काय करता? आमच्या शेतात, वस्तीत येऊन पाहणी करा, अशी सवालवजा विनंतीही शेतकºयांनी मुख्यमंत्र्यांना केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळीच सोलापूर येथील सांगवी खुर्दला पोहोचले. या भागात पाऊस झाल्यामुळे चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिका?्यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकºयांच्या बांधावर न जाण्याचा सल्ला देत बोरी नदीवरील पुलावरच शेतकºयांची भेट घेऊन त्यांची गाºहाणी ऐकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुलावरूनच शेतक?्यांचा संवाद साधला. मुख्यमंत्री भेटायला येणार म्हणून शेतकºयांनी आधी त्यांना पुलावर भेटण्यास नकार देत नुकसान झालेल्या ठिकाणी भेटायला येण्याची मागणी केली. मात्र, मुख्यमंत्री न आल्याने नासलेली पिकं घेऊन शेतकरी सांगवी पुलावर गेले. मात्र, तिथेही प्रशासकीय अधिकाºयांनी शेतकºयांंना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. केवळ दहाच शेतकºयांना मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची परवानगी दिली. यावेळी शेतकºयांनी उद्ध्वस्त झालेली पिकं मुख्यमंत्र्यांना दाखवत पुलावरून विचारपूस काय करता? जिथं आमचं नुकसान झालं तिथे येऊन पाहणी करा, अशी विनंती केली.

मुख्यमंत्र्यांनीही शेतकºयांची विचारपूस केली. त्यांची निवेदनं स्वीकारली आणि नुकसानीची माहिती घेतली. तसेच पंचनामे सुरू झालेत का? स्थानिक पातळीवर मदत मिळाली का याची माहिती देतानाच सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. काळजी करू नका, असा धीरही त्यांनी शेतकºयांना दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कृषी मंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह स्थानिक आमदारही उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: The farmers met the Chief Minister with the lost crops of soybean, tur and onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.