शेतकºयाने कांद्यावर फिरविला ट्रॅक्टर, सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:49 AM2018-10-16T10:49:55+5:302018-10-16T10:53:50+5:30
नान्नज: कांद्याला लाखो रुपये खर्चूनही पावसाअभावी पीक जळून गेले. यामुळे वैतागलेल्या नान्नजमधील अक्षय गवळी या शेतकºयाने दोन एकर कांद्यावर ...
नान्नज: कांद्याला लाखो रुपये खर्चूनही पावसाअभावी पीक जळून गेले. यामुळे वैतागलेल्या नान्नजमधील अक्षय गवळी या शेतकºयाने दोन एकर कांद्यावर ट्रॅक्टर फिरविला. पावसाअभावी पिकांची अवस्था वाईट असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
उत्तर तालुक्याच्या वाट्याला दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. यावर्षीची सर्व नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ३८ टक्के पाऊस पडलेला असताना उत्तर तालुका दुष्काळी यादीतून वगळला आहे. पावसाच्या भरवशावर अक्षय गवळी यांनी शेतात तीन एकर कांद्याची लागवड केली.
पाऊस न आल्यामुळे लागवड केलेली कांद्याची रोपे जतन करण्यासाठी त्यास ठिबकही केले. पुन्हा एक एकर कांदा लागवड तयार करण्यासाठी रानही तयार केले होते. कांद्याला काही पाणी पुरेनासे झाले़ गवळी यांच्याकडे एक बोअरवेल आहे. त्यावरील मोटार फक्त पंधरा ते वीस मिनिटे चालते. विहिरी तर कोरड्या पडत आहेत.
कांदा पिकासाठी लाखो रुपये खर्च करून पाऊस न आल्याने जळून गेले. नाराज झालेल्या गवळी यांनी आपल्या शेतातील कांदा पीक व कांद्याच्या रोपावर ट्रॅक्टर फिरवून कुळवणी केली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेली असून, जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. कर्जाने ग्रासलेल्या शेतकºयास आर्थिक मदतीची गरज आहे.