कमी ओलीवर शेतकऱ्यांचा पेरणीवर झपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:16 AM2021-06-20T04:16:30+5:302021-06-20T04:16:30+5:30
होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. तशी मृग नक्षत्राच्या पावसाची सुरुवातही झाली आहे. मात्र, आतापर्यंत पडलेला पाऊस खरीप पीक ...
होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. तशी मृग नक्षत्राच्या पावसाची सुरुवातही झाली आहे. मात्र, आतापर्यंत पडलेला पाऊस खरीप पीक उगवण व वाढीसाठी पुरेसा नसल्याचे तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी सांगितले. मात्र, पडलेल्या पावसावर शेतक-यांनी सोयाबीन, मूग, उडीद, मका आदींची पेरणी सुरू केली आहे. कळमण, गावडीदारफळ, वडाळा, रानमसले, बीबीदारफळ, मार्डी परिसरात शेतकरी पेरणीत गुंग झाला आहे. शेतक-यांना यापुढेही चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
----
१०० मिमी पाऊस
उत्तर सोलापूर तालुक्यात आतापर्यंत ७३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात एकूण १०० मि.मी. पाऊस पडला आहे. शेळगी मंडलात १२३ मि.मी., तिर्हे मंडलात ८७ मि.मी., मार्डी मंडलात ८३ मि.मी., वडाळा मंडलात ९४ मि.मी. तर सोलापूर मंडलात ११३ मि.मी. पाऊस पडला आहे. आतापर्यंत सरासरीच्या १३७ टक्के इतका पाऊस पडला आहे. मागील वर्षी आतापर्यंत एकूण ८२ मि.मी. म्हणजे १११ टक्के इतका पाऊस पडला होता.
----
उत्तर तालुक्यात खरीप पेरणी क्षेत्र परिसरात म्हणावा इतका पाऊस पडला नाही. आता पावसाने ओढ दिली तर केलेली पेर वाया जाईल. त्यामुळे शेतक-यांनी चांगला पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.
- मनीषा मिसाळ, तालुका कृषी अधिकारी
---
फोटो : १९ उत्तर सोलापूर
उत्तर तालुक्यात शेतकरी खरीप पेरणी करताना दिसत आहे.