उन्हाळी मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:07+5:302021-05-25T04:25:07+5:30
खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीची मशागत करून प्रसंगी उसनवार किंवा कर्जाऊ रक्कम घेऊन पेरणी केली आणि निसर्गाने साथ दिली ...
खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीची मशागत करून प्रसंगी उसनवार किंवा कर्जाऊ रक्कम घेऊन पेरणी केली आणि निसर्गाने साथ दिली तरच रोजीरोटीचा भेडसावणारा प्रश्न सुटेल या आशेपोटी बळीराजा शेतीची उन्हाळी मशागत करताना दिसत आहे. यामध्ये शेतीची नांगरट करून फणपाळी करून पेरणीसाठी शेत तयार ठेवण्यासाठी धावपळ सुरू आहे.
ऊस शेतीकडे वाढता कल
मागील १४ महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शेतीमध्ये घेतलेली केळी, द्राक्ष, डाळिंब आदींसह भाजीपाला बाजारात विकताना मालाचा उठाव होत नसल्याचे कारण पुढे करून व्यापारी अनेकदा कवडीमोल भावाने खरेदी करतात. यामुळे पीक घेण्यासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांच्या हातात मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. त्यामुळे शेतीमध्ये उसाचे उत्पादन घेतले तर ऊस कारखान्याला गाळप होऊ शकतो. यामुळे शेतकरी सध्या ऊस शेतीकडे वळताना दिसू लागले आहेत.
कोट ::::::::::::::::::::::
शेती करायची असेल तर नफा आणि तोट्याचा विचार करून चालत नाही. शेतीपिकांना भाव कमी मिळत असला तरी उत्पादन जास्तीचे घेण्याची कसरत केली तर शेतकरी टिकू शकेल.
- भारत व्यवहारे
शेतकरी, नेमतवाडी
फोटो ::::::::::::::::::::
नेमतवाडी (ता. पंढरपूर) येथील गोरख खुळे यांच्या शेतीची मशागत करण्यासाठी सुरू असलेली लगबग.