सांगली-सोलापूर या राष्टÑीय महामार्गावरील शेतकरी झाले ‘कोट्यधीश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:41 AM2019-01-07T10:41:31+5:302019-01-07T10:43:00+5:30

मल्लिकार्जुन देशमुख मंगळवेढा : ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’ या म्हणीचा प्रत्यय मंगळवेढा तालुक्यातील ८ गावांतील शेतकरी ...

Farmers on Sangli-Solapur National Highway | सांगली-सोलापूर या राष्टÑीय महामार्गावरील शेतकरी झाले ‘कोट्यधीश’

सांगली-सोलापूर या राष्टÑीय महामार्गावरील शेतकरी झाले ‘कोट्यधीश’

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवेढ्यात शेतकºयांना मिळणार २९४ कोटीएक एकर जमिनीस दीड कोटीपेक्षा जास्त मोबदलानवीन कायद्यामुळे शेतकरी वर्गाला लाभ

मल्लिकार्जुन देशमुख

मंगळवेढा : ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’ या म्हणीचा प्रत्यय मंगळवेढा तालुक्यातील ८ गावांतील शेतकरी कुटुंबीयांना झाला़. नियोजित सांगली-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग मंगळवेढा तालुक्यातील ८ गावांतून जात आहे़ महामार्गालगतच्या ५५६ गटांतील ८ लाख ७६ हजार ३६ चौरस मीटर क्षेत्र यासाठी जमीन संपादित करण्यात आली़  जमिनीच्या मोबदल्यापोटी शेतकºयांना तब्बल २९३ कोटी ५७ लाख ५२ हजार ९४ रुपये मिळणार आहेत . एक एकरास तब्बल दीड कोटीचा मोबदला मिळणार आहे. शेतकºयांना मिळालेली रक्कम कोटीत आहे़ आठ गावांतून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने मोबदल्यामुळे मिळत असलेल्या रकमेने शेतकºयांना रातोरात कोट्यधीश केले आहे.

दुष्काळी परिस्थिती, नापिकी, पाणीटंचाई, शेतीला अल्प भाव यामुळे शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले़. शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच एक सुखद वार्ता हाती आली़ तालुक्यातील माचणूर, ब्रह्मपुरी, गणेशवाडी, कचरेवाडी, लक्ष्मीदहिवडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, मंगळवेढा या आठ गावांतील ५५६ गटांतील ८ लाख ७६ हजार ३६ चौरस मीटर क्षेत्र जमिनीचे संपादन करण्यात आले़. शेतकºयांना २९३ कोटी ५७ लाख ५२ हजार रुपये ९४ पैसे एवढ्या रकमेचा मोबदला मिळणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील आठ गावांतील गटसंख्या, संपादित क्षेत्र व मिळणारी मोबदला रक्कम पुढीलप्रमाणे-माचणूर गावातील १० गटांतील २७ हजार ४३२ चौरस मीटर क्षेत्र संपादित केले असून, यासाठी ११ कोटी ८२ हजार ४९९ रुपये मोबदला मिळणार आहे. ब्रह्मपुरी येथील १५१ गटांतील १ लाख ११ हजार ९१ चौरस मीटर क्षेत्र संपादन केले असून, यासाठी ४७ कोटी ३२ लाख ७४ हजार २३६ रुपये मोबदला मिळणार आहे. गणेशवाडी येथील ३५ गटांतील ८२ हजार १८८ चौरस मीटर क्षेत्र संपादित केले असून, शेतकºयांना २६ कोटी ८१ लाख ९ हजार ४२५ रुपये मोबदला मिळणार आहे. कचरेवाडी येथील ८ गटांतील २ हजार ९८१ चौरस मीटर क्षेत्र संपादन केले असून, यापोटी ९२ लाख ९० हजार २६७ रुपये मोबदला मिळणार आहे.

लक्ष्मी दहिवडी येथील १३ गटांतील ९ हजार ४ चौरस मीटर क्षेत्र संपादित केले आहे. यापोटी २८ कोटी ५४ हजार ६८६ रुपये मोबदला मिळणार आहे. आंधळगाव येथील ८० गटांतील २ लाख १६ हजार ७०८ चौरस मीटर क्षेत्र संपादित झाले असून, यापोटी ६७ कोटी १८ लाख ८७ हजार ८१३ रुपये मोबदला मिळणार आहे. लेंडवे चिंचाळे येथील ५ गटांतील २३ हजार ८०६ चौरस मीटर क्षेत्र संपादन झाले असून, यापोटी ७ कोटी २४ लाख ४० हजार ३ रुपये मोबदला मिळणार आहे. मंगळवेढा येथील सर्वाधिक २५४ गटांतील ४ लाख २८२६ चौरस मीटर क्षेत्र संपादित झाले असून, यापोटी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल १३० कोटी २६ लाख १३ हजार १६४ रुपये मोबदला मिळणार आहे. यापैकी मंगळवेढा वगळता सात गावांतील शेतकºयांना नोटिसा दिल्या आहेत. आठ दिवसांत मंगळवेढा येथील मोबदला रक्कम मिळणार असल्याचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.

नवीन कायद्यामुळे शेतकरी वर्गाला लाभ
च्मंगळवेढा तालुक्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चौपदरीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी ताब्यात घेण्यात येत असलेल्या जमिनींना नवीन जमीन अधिग्रहण कायद्यानुसार रक्कम भरपाई म्हणून दिली जात आहे. या जमिनींमध्ये ग्रामीण भागासह मंगळवेढा नगरपालिका क्षेत्रातील जमिनींचा समावेश आहे. सध्या मंगळवेढा येथील २५४ गटांतील शेतकºयांना अद्याप नोटिसा प्राप्त झाल्या नसून येथील शेतकरी चातक पक्ष्याप्रमाणे नोटिसांची वाट पाहत आहेत. नवीन भूमी अधिग्रहण कायद्यानुसार शेतकºयांच्या जमिनींना चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकºयांचा विरोध मावळला आहे.

एक एकर जमिनीस दीड कोटीपेक्षा जास्त मोबदला
च् सोलापूर-सांगली या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहीत केली जात आहे. अधिग्रहीत जमिनीला नवीन अधिग्रहण कायद्यानुसार पैसे दिले जात आहेत. त्यानुसार मंगळवेढा तालुक्यातील काही शेतजमिनीला एकरी १ कोटी ६० लाख रुपये, असा अधिकतम दर देण्यात आला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मंगळवेढा तालुक्यातील ८ गावांतून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जात असून, या आठ गावांतील ५५६ गटांतील ८ लाख ७६ हजार ३६ चौरस मीटर क्षेत्र जमिनींचे संपादन करण्यात आले आहे. यापोटी शेतकºयांना २९३ कोटी ५७ लाख ५२ हजार रुपये ९४ पैसे एवढ्या रकमेचा मोबदला मिळणार आहे. यापैकी ६५ कोटी रुपयांचे शेतकºयांना वाटप करण्यात आले आहे.
- प्रमोद गायकवाड
 प्रांताधिकारी, मंगळवेढा

Web Title: Farmers on Sangli-Solapur National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.