शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करावी, मकरंद अनासपुर यांचे आवाहन, कासाळ ओढ्यावर जलपूजन, लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:35 AM2017-11-08T11:35:17+5:302017-11-08T11:40:29+5:30

जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल.

Farmers should come together and make groups, appeals to Makrand Anaspur, Jalpujan on public welfare, Opening ceremony | शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करावी, मकरंद अनासपुर यांचे आवाहन, कासाळ ओढ्यावर जलपूजन, लोकार्पण सोहळा

शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करावी, मकरंद अनासपुर यांचे आवाहन, कासाळ ओढ्यावर जलपूजन, लोकार्पण सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देनाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली१५० एकर क्षेत्र आले ओलिताखालीजि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि ८ : जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल. कासाळ ओढ्यात ५०४ टीसीएम जलसाठा तयार झाल्याने शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग करावा. यापुढे गावातील युवकांनी प्रत्येक कामात संवाद साधून जलसंधारणाची कामे करावीत. तरच हिवरे बाजार, राळेगणसिद्धीसारखा आपल्याला बदल झालेला दिसेल, असे सांगून नाम फाउंडेशन नेहमी तुमच्या बरोबर असेल, असा विश्वास नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिला. 
कटफळ (ता. सांगोला) येथील गावची अर्थवाहिनी असलेल्या सात कि. मी. कासाळ ओढ्याचे लोकसहभाग, नाम फाउंडेशन, जनशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून पुनरुज्जीवनामुळे ओढ्यावरील पाच बंधाºयांसह ओढ्यात सुमारे ५०४ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचे जलपूजन व लोकार्पण सोहळा नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाण्याची खणानारळांनी ओटी भरून जलपूजन करताच नाम फाउंडेशनचा विजय असो, जनशक्ती संघटनेचा विजय असो, असा नारा देण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसीलदार संजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उपसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, नाम फाउंडेशनचे राजाभाऊ शेळके, सभापती मायाक्का यमगर, सरपंच प्रा. सरिता भिंगे, चंद्रकांत देशमुख, प्रा. नानासाहेब लिगाडे, जि. प. सदस्य गोविंद जरे, अ‍ॅड. सचिन देशमुख, माजी सरपंच उत्तम खांडेकर, महुदचे सरपंच बाळासाहेब ढाळे, उपसरपंच दिलीप नागणे, रवींद्र कदम, उद्योजक विठ्ठल बागल, मच्छिंद्र खरात, अ‍ॅड. धनंजय मेटकरी यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, युवक, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी मकरंद अनासपुरे यांनी जनशक्ती फाउंडेशनने गावात महिला संवाद केंद्र सुरू करून महिलांच्या समस्या याच केंद्रामार्फत सोडवाव्यात. या केंद्रातून महिलांना रोजगार चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत. या कामात नाम फाउंडेशन तुमच्या पाठीशी असेल, असे सांगितले. या गावातील जो युवक हुंडा घेईल, तो नामर्द असेल. युवकांनी हुंडा न घेता महिलेचा आदर करावा, असा मौलिक सल्लाही अनासपुरे यांनी दिला. ओढा परिसरपरिसर हिरवागार करा, तो मी पाहण्यास जरूर येईन, असे आश्वासनही अनासपुरे यांनी दिले. 
यावेळी जिल्हाधिकारी  भोसले, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, चंद्रकांत देशमुख, राजाभाऊ शेळके, मारुती पुजारी आदींनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. संतोष सावंत यांनी केले. सूत्रसंचालन आबासाहेब खरात यांनी केले, तर अ‍ॅड. विजयसिंह खरात यांनी आभार मानले.
-------------------
कटफळचा बाजारपेठेत दबदबा
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली. या कामात मकरंद अनासपुरे यांचा सिंहाचा वाटा आहे. आता आम्ही ३ हजार ३०० एकर वन क्षेत्रावर सीसीटी तयार करून पावसाळ्यात पडणारे पाणी गावातच अडवून गाव कसे पाणीदार होईल, यासाठी काम करणार आहोत. आज पाण्यामुळे आमच्या भागात फळे, भाजीपाल्याच्या दर्जेदार उत्पादनामुळे कटफळचा बाजारपेठेत दबदबा वाढल्याचे जनशक्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
------------------
जि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात
- या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवसानिमित्त कटफळ परिसरात जि. प. प्राथ. शाळेत डिजिटल शाळा उपक्रमास सुरुवात केली. उद्योजक नवनाथ हांडे यांच्या सहकार्यातून मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शाळेला संगणक संच भेट देऊन विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. 
--------------
१५० एकर क्षेत्र आले ओलिताखाली
- आपल्या गावातील लोक गावातच कसे राहतील, ही उमेद घेऊन गावातील मारुती मंदिरात नाम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आणि बघता-बघता गावातील सर्वांनी मतभेद विसरून कासाळ ओढा पुनरुज्जीवन केल्याने १५० एकर क्षेत्र सुपीक होऊन ओलिताखाली आले आहे. हे एकीचे बळ असल्याचे प्रा. संतोष सावंत यांनी सांगितले. 

Web Title: Farmers should come together and make groups, appeals to Makrand Anaspur, Jalpujan on public welfare, Opening ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.