शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली पाहिजे, मात्र साखरेला उठाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:57+5:302021-06-19T04:15:57+5:30

पुढे भरणे म्हणाले, आमदार असो की, जिल्हा परिषद सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी सारखेच असतात. जो निधी येईल त्याचे समप्रमाणात वाटप ...

Farmers should get FRP, but sugar should not be raised | शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली पाहिजे, मात्र साखरेला उठाव नाही

शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली पाहिजे, मात्र साखरेला उठाव नाही

Next

पुढे भरणे म्हणाले, आमदार असो की, जिल्हा परिषद सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी सारखेच असतात. जो निधी येईल त्याचे समप्रमाणात वाटप झालेच पाहिजे. मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेला डीपीडीशीच्या निधी वाटपामध्ये कमी-जादा प्रमाण झाले होते. सर्व लोकप्रतिनिधींना समप्रमाणात निधी दिला पाहिजे. यासाठी निर्णय घेणार आहेत. पंढरपूरच्या विकास प्राधिकरणासंदर्भात एकही बैठक झाली नाही; परंतु लवकरच याबाबत बैठक लावून आढावा घेणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

::::: भीमा अस्थीकरणाची योजना शेतकऱ्यांची ::::: उजनी धरणावर अनेक योजनांचा ताण पडत असून, यातील पाण्याला मागणी वाढत आहे. यात आणणारी भीमा स्थिकरणाची योजना झालीच पाहीजे. भीमा स्थिकरणाची योजना कोण्या एकट्याची नाही, ही योजना शेतकऱ्यांची आहे. या योजनेसाठी आवश्यक ते प्रयत्न करणार आहे. हा विषय पक्षाचा व राजकारणाचा नसल्याचे भरणे यांनी सांगितले.

:::::आरक्षणाची मागणी करणे गैर नाही ::::

धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास आषाढीच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येऊ देणार नाही, असा इशारा धनगर समाजाने दिला आहे. यासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनगर व मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षणाची मागणी करणे गैर नाही, धनगर समाज अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहे, त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असे त्यांनी सांगितले.

Web Title: Farmers should get FRP, but sugar should not be raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.