ग्राहक विक्री योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:21 AM2021-03-25T04:21:36+5:302021-03-25T04:21:36+5:30
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत चालू केलेल्या पिकेल ते विकेल या योजनेअंतर्गत थेट शेतकरी ते ग्राहक या विक्री योजनेच्या शुभारंभप्रसंगी ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत चालू केलेल्या पिकेल ते विकेल या योजनेअंतर्गत थेट शेतकरी ते ग्राहक या विक्री योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, बाळासाहेब लांडे, सुभाष माळी, राजेंद्र लांडे, विष्णूपंत जाधव, मंडळ कृषी अधिकारी अतुल ढवळे, कृषी पर्यवेक्षक एस. डी. पवार, कृषी सहाय्यक एस. एम. साठे, सुखदेव अडसूळ, डी. एम. शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमास शेतकऱ्यांऐवजी भाजीपाला विक्रेते
रवींद्र माने यांचा दौरा अचानक ठरल्याने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली अन् त्यांनी मुख्य बाजारतळ सोडून चौकात कार्यक्रम घेतला. शेतकऱ्यांच्या जागी चक्क भाजीपाला व्यापार करणारे लोक आणून बसविले होते. दरम्यान, रवींद्र माने यांनीही आचारसंहितेचे कारण पुढे करीत याठिकाणी ना फित कापून उद्घाटन केले ना श्रीफळ वाढविला. फक्त फोटोसेशन झाले व कार्यक्रमही संपला अन् बाजारही संपला.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने पिकेल ते विकेल ही शेतकऱ्यांना दिलासा व लाभदायक योजना सुरू केली आहे. मात्र, त्याचा परिणाम कारक प्रचार व प्रसार होत नसल्याने गरजू शेतकरी यापासून वंचित राहत आहेत. मोहोळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने मंगळवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांच्या दौऱ्याचे निमित्त साधून थेट शेतकरी ते ग्राहक या योजनेचा शुभारंभ आयोजित केला होता. ऐनवेळी ठरलेल्या या कार्यक्रमासाठी मग कृषी कर्मचाऱ्यांनी मग चक्क भाजीपाला व्यापारीच शेतकरी म्हणून आणून बसविले.
कोट ::::::::
कृषी सहाय्यक यांच्याकडून अशी चूक झाली असली तरी आम्ही यात सुधारणा करून योग्य लाभार्थी शेतकरी आहेत का याची खात्री करूनच यासाठी देण्यात येणारी छत्री व अन्य सहकार्य केले जाईल. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकविलेला भाजीपाला व फळफळावळ आदी माल व्यापाऱ्यांकडे न देता या योजनेतून थेट ग्राहकाला विक्री करावा.
- एस. डी. पवार,
पर्यवेक्षक
फोटो२४ कुरुल०१