शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:21 AM2021-03-26T04:21:43+5:302021-03-26T04:21:43+5:30

शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, ...

Farmers should try to increase sugarcane production per acre | शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे

शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे

Next

शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, व्हा. चेअरमन ॲड. प्रकाशराव पाटील व संचालक मंडळाच्या उपस्थितीत कारखान्याच्या उदय सभागृहात ऑनलाइन पार पडली.

या सभेत मार्गदर्शन चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, साखर उद्योग कठीण परिस्थितीतून जात आहे. आज देशात ९८ लाख मे. टन साखर शिल्लक आहे. पुढील वर्षी त्यात वाढ होईल. भविष्यात केवळ साखर उत्पादन करून कारखाने चालविणे परवडणारे नाही. त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

या ऑनलाइन सभेचे विषय वाचन कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी केले. विविध ठरावाला सभासदांनी ऑनलाइन मंजुरी दिली. आभार सचिव अभयसिंह माने-देशमुख यांनी मानले.

फाेटो

२६अकलूज०१

ओळी

शंकरनगर- अकलूज येथील सहकार महर्षी कारखान्याच्या ऑनलाइन सभेत बोलताना चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील. व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील, व्हा. चेअरमन ॲड. प्रकाशराव पाटील.

Web Title: Farmers should try to increase sugarcane production per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.