अतिवृष्टीचा निधी खात्यात जमा न झाल्याने वालवडच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:36 AM2020-12-16T04:36:52+5:302020-12-16T04:36:52+5:30

या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्याचे सरकारनी जाहीर करूनही दिवाळीचा सण संपून दीड महिना झाला तरीही अतिवृष्टीमुळे ...

Farmers in Valwad warn of agitation | अतिवृष्टीचा निधी खात्यात जमा न झाल्याने वालवडच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

अतिवृष्टीचा निधी खात्यात जमा न झाल्याने वालवडच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Next

या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्याचे सरकारनी जाहीर करूनही दिवाळीचा सण संपून दीड महिना झाला तरीही अतिवृष्टीमुळे वालवड (ता. बार्शी) येथील शेतीचे नुकसान होऊनही निधी मिळाला नाही. मात्र या तालुक्यासाठी शासनाकडून जो निधी आला होता. त्या निधीचे सम प्रमाणात न वाटता काही ठराविक गावांनाच वाटप करण्यात आल्यामुळे वालवड, चारे या गावांतील शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.

त्यामुळे मंजूर निधी जर शेतकऱ्याच्या बँक खात्यात संबंधितांनी शुक्रवार (दि. २५)पर्यंत खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा न केल्यास वालवड येथील शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी चंद्रकांत शंकरराव जाधवर, नानासाहेब जाधवर, अच्युत जाधवर, अजय जाधवर, संतोष भालेराव, सुधाकर जाधवर, धनाजी कदम, दीपक कदम, बळीराम जाधवर, दादाराव जाधवर, शिवाजी कदम हे शेतकरी उपस्थित होते.

-----

Web Title: Farmers in Valwad warn of agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.