ओढे, नाल्यांसह माण नदीही वाहू लागल्याने शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:27 AM2021-09-09T04:27:48+5:302021-09-09T04:27:48+5:30
तीन दिवसांत तालुक्यातील नऊ मंडलनिहाय ३४८ मि.मी. तर सरासरी ३८ मि.मी. पाऊस झाला आहे. सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने ...
तीन दिवसांत तालुक्यातील नऊ मंडलनिहाय ३४८ मि.मी. तर सरासरी ३८ मि.मी. पाऊस झाला आहे. सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या सुमारे १६ हजार ४९५ हेक्टरवर बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, भुईमूग आदी पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. सध्या सर्वच पिके जोमात आहेत. दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात पूर्वा नक्षत्राचा धुवाधार पाऊस झाल्यामुळे ओढे-नाले बंधारे भरून वाहू लागले आहेत.
खड्ड्यांमुळे रात्रीचा प्रवास ठरतोय धोकादायक
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे सांगोला-महूद रस्त्यावरून रात्री-अपरात्री प्रवास करणे वाहनधारकांना धोक्याचे बनले आहे. मंगळवारी दुपारी ३ नंतर पावसाने उघडीप दिली. मात्र, आकाशात ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची चिन्हे दिसून येत आहेत.
मंडलनिहाय झालेला पाऊस
सांगोला तालुक्यात सलग तीन दिवस नऊ मंडलमध्ये सांगोला ५६, हातीद-२६, नाझरे ७८, महूद ३९, संगेवाडी २४, सोनंद ४२, जवळा २४, कोळा ४७, शिवणे १३ असा एकूण ३४८ मि.मी. तर सरासरी ३९ मि.मी. पाऊस झाला आहे.
फोटो ओळ :::::::::::::
सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे नाझरे येथील आमिर तांबोळी यांच्या धाब्याच्या घराची भिंत पडल्याचे छायाचित्र.