शेतक-यांना घरबसल्या मिळणार पिकांची माहिती मोबाइलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:42 AM2021-02-21T04:42:44+5:302021-02-21T04:42:44+5:30
या कृषी संशोधनाबाबत संवाद साधला असता डॉ. तांबडे म्हणाले, लॉकडाऊन काळात दर्जेदार स्वॉफ्टवेअर वापरून जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण, ...
या कृषी संशोधनाबाबत संवाद साधला असता डॉ. तांबडे म्हणाले, लॉकडाऊन काळात दर्जेदार स्वॉफ्टवेअर वापरून जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण, हवामान, लागवडीचा कालावधी व हंगाम, खत अन् पाणी व्यवस्थापन, कीड, तण नियंत्रण, काढणी, विक्री व्यवस्थापन, ग्रेडिंग पॅकिंग ही सर्व माहिती, तसेच कृषीपूरक व्यवसायामध्ये पशूंची माहिती त्यांचा आहार विहार, संगोपन आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे आणि मूल्यवर्धन करणे या सर्वाची माहिती असलेल्या पुस्तिकेच्या स्वाफ्ट कॉपी बनविल्या. त्या क्यूआर कोडमध्ये जनरेट केल्या. त्याचे डिझायनिंग करून शेतीबद्दल माहिती असलेला उत्कृष्ट असा डिजिटल बोर्ड तयार केला. त्यावर संबंधित पिकांची माहितीचा क्यूआर कोड व त्याचे चित्र वापरले. त्यामुळे तो सहजासहजी कोणलाही वापरता येऊ लागला. तो बोर्ड आता गावोगावी लावला जात आहेत. आतापर्यंत साकत, पिंपरी ता. बार्शी व बोरामणी ता. दक्षिण सोलापूर या ठिकाणी ते लावले आहेत. मागणीनुसार हे बोर्ड आता संबंधित गावात लावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
डिजिटल बोर्डावर ही पिके, प्रक्रिया उद्योग, व्यवसायाची माहिती
डिजिटल कृषी माहिती बोर्डावर ढोबळी मिरची, कांदा, शेवगा, भेंडी, हरभरा, ऊस, तूर, सोयाबीन, कलिंगड/खरबूज, मका ही प्रमुख पिके, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय हे व्यवसाय तर सोयाबीन व ज्वारी प्रक्रिया या दोन प्रक्रिया उद्योगाचा समावेश आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहितीसुद्धा त्यात आहे.
माहिती घेण्याची प्रक्रिया
ज्या ठिकाणी डिजिटल कृषी माहिती बोर्ड लावला आहे. त्यावरील हव्या त्या पिकांची माहिती घेण्यासाठी आपल्या मोबाईलवर क्यूआर कोड स्कॅन करावा. नंतर संबंधित पिकाची माहिती मोबाईलवर डाऊनलोड करावी. ती माहिती पुन्हा कधीही, केव्हाही उपलब्ध होऊ शकते. त्याचा शेतक-यांना फायदा होत आहे.
या संशोधनाचे फायदे
पिकांची माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा जो खर्च होत होता त्याची बचत होईल. माहिती पुस्तिका कार्यालयात ठेवण्यासाठी जागा लागायची ती आता लागणार नाही. माहिती पुस्तिका देण्यासाठी कर्मचा-याची आवश्यकता भासणार नाही. शेतकरी माहितीपुस्तिका घेऊन गेल्यानंतर अनावधानाने कुठेही पडून प्रदूर्षण होत होते. आता पर्यावरणाचे रक्षण होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी वेळ, पैसा, श्रम सर्व वाचणार आहे. हे या संशोधनाचे फायदे आहेत.
कोट ::::::::::
या क्यूआर कोड मोबाईलमध्ये स्कॅन करून घेतल्यामुळे पिकांची माहिती घेण्यासाठी आता कोठेही जायची गरज नाही. आमच्याच मोबाईलमध्ये कधीही, केव्हाही सहजपणे पिकांची लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व माहिती उपलब्ध होत आहे. त्याचा आम्हाला फायदाच होत आहे.
- विष्णू चोरमले,
शेतकरी, ढोराळे, ता. बार्शी