फलोत्पादन पिके असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार , जाणून घ्या शासनाची कार्यक्रम

By Appasaheb.patil | Published: August 24, 2023 07:41 PM2023-08-24T19:41:11+5:302023-08-24T19:41:30+5:30

लाभार्थीं निवडीचे हे आहेत निकष..

Farmers with horticulture crops will get huge help, know about the government program | फलोत्पादन पिके असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार , जाणून घ्या शासनाची कार्यक्रम

फलोत्पादन पिके असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार , जाणून घ्या शासनाची कार्यक्रम

googlenewsNext

सोलापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम या योजनेसाठी जिल्हयासाठी १४८६.३१ लाखापर्यंतचा कार्यक्रम राबविण्यास मान्यता प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वत: शेतजमिनी असणाऱ्या लाभार्थ्यांनी तातडीने संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भातील उत्पादनासाठी आता लाभार्थ्यांना मोठी मदत मिळणार आहे.

ड्रॅगन फ्रुट, ॲवोकॅडो, सुट्री फुले मसाला पिके, फळबाग पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग,डाळिंब पिकासाठी अँन्टी हेलनेट कव्हर , मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच , ट्रॅक्टर 20एचपी पर्यंत , पॉवर टिलर ८ एचपी पेक्षा जास्त व कमी, पिक संरक्षण उपकरणे, पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीत खोली, शीतगृह, रेफर व्हॅन, रापनिंग चेंबर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ स्थाई, फिरते विक्री केंद्र –शीत चेंबरच्या सुविधासह, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व भाजीपाला रोपवाटीका घटकांचा समावेश आहे.

लाभार्थीं निवडीचे हे आहेत निकष..
लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावे स्वत:ची शेत जमिन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक राहील. तरी जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

Web Title: Farmers with horticulture crops will get huge help, know about the government program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.