जमीन वहिवाटीस अडथळा करणाऱ्या विरुद्ध करमाळा तहसीलसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:19+5:302021-06-22T04:16:19+5:30
करमाळा : जमीन वहिवाटीचा न्यायालयाचा आदेश असताना शेतजमीन वहिवाटीस सतत बळाचा वापर करून अडथळा ...
करमाळा : जमीन वहिवाटीचा न्यायालयाचा आदेश असताना शेतजमीन वहिवाटीस सतत बळाचा वापर करून अडथळा करणारे महादेव गबाजी कांबळे यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ करमाळा तहसील कार्यालयासमोर बिटरगाव वांगी येथील दादासाहेब सरडे या शेतकऱ्याने उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
वांगी (ता. करमाळा) येथील गट नं ३८५/१ क ही वर्ग २ ची ८१ आर जमीन विभागीय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीने १३ मे २००५ रोजी खरेदी केली असताना महादेव गबाजी कांबळे व इतर अडथळा करीत आहेत. या शिवाय गट नं. ३८५, ३८६ व ३८७ या जमिनीच्या वादा संदर्भातील प्रकरण गेली ६ वर्षे न्यायप्रविष्ट आहे. करमाळा न्यायालयाने वहिवाटीचा हुकूम असताना व जिल्हा न्यायालयाचा वहिवाटीचा हुकूम असताना प्रतिवादी महादेव कांबळे व इतर १४ जण बळाचा वापर व ॲट्रॉसिटीचा गैरवापर करून आमच्या उभ्या पिकांचे नुकसान करत आहेत. न्यायालयाचा अवमान करून दहशत निर्माण करून आमची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे निवेदन तहसीलदारांना १७ जूनपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा पाचवा दिवस आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
-----
करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले दादासाहेब सरडे व इतर शेतकरी.