तेलंगणात आरक्षणावरून झालेल्या बंजारा समाजावरील हल्ल्याचा सोलापूरात तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:56 PM2017-12-18T12:56:58+5:302017-12-18T12:59:16+5:30

 तेलंगणा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून बंजारा समाजावर हल्ला करण्यात आला़ यात पाच जणांचा मृत्यू झाला़ या घटनेचा नेहरू नगरजवळील सेवालाल चौकात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. 

Fast protest in Solapur due to the attack on Banjara community held in Telangana | तेलंगणात आरक्षणावरून झालेल्या बंजारा समाजावरील हल्ल्याचा सोलापूरात तीव्र निषेध

तेलंगणात आरक्षणावरून झालेल्या बंजारा समाजावरील हल्ल्याचा सोलापूरात तीव्र निषेध

Next
ठळक मुद्देतेलंगणा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन दोन समाजात तणावाचे वातावरणसंवैधानिक हक्कासाठी  गोर बंजारा समाजाने लाखोंच्या संख्येने  रस्त्यावर येऊन विरोध दर्शविलाआदिलाबाद जिल्ह्यातील हसनापूर येथील गोर बंजारा समाजावर  हल्ले करायला  लावले़


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ :  तेलंगणा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून बंजारा समाजावर हल्ला करण्यात आला़ यात पाच जणांचा मृत्यू झाला़ या घटनेचा नेहरू नगरजवळील सेवालाल चौकात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. 
तेलंगणा राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन दोन समाजात तणावाचे वातावरण होते. १३ डिसेंबर रोजी आपल्या संवैधानिक हक्कासाठी  गोर बंजारा समाजाने लाखोंच्या संख्येने  रस्त्यावर येऊन विरोध दर्शविला होता़  गोर बंजारा समाजाची एकी पाहून काही गौंड समाजाच्या नेत्यांनी गौंड समाजाला भडकून १५ डिसेंबर रोजी आदिलाबाद जिल्ह्यातील हसनापूर येथील गोर बंजारा समाजावर  हल्ले करायला  लावले़ या हल्ल्यात गोर बंजारा समाजाचे पाच लोक मृत्युमुखी  पडले असून शंभराहून अधिक  लोक गंभीर जखमी झालेले  आहेत. अनेकांच्या  मालमत्तेचीसुद्धा  प्रचंड हानी केली गेलेली आहे़ या अमानवीय घटनेमुळे देशभरातील गोर बंजारा समाजात प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे़
यावेळी नगरसेविका मेनकाताई राठोड, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी राठोड, राजू पवार, दीपक पवार, राजकुमार पवार, सुरेश राठोड, सविता राठोड,सुनीता राठोड(ठाणे), शिवराज राठोड, राजकुमार राठोड, संजय चव्हाण,नितीन चव्हाण, रमेश राठोड, अनिल जाधव, राहुल चव्हाण, दीपक राठोड, योगेश राठोड, प्रेम राठोड, विनोद पवार, अक्षय पवार, रवि जाधव, पापा चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Fast protest in Solapur due to the attack on Banjara community held in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.