१५ टक्के बोनससाठी यंत्रमाग संघ कार्यालयासमोर आमरण उपोषण

By बाळकृष्ण दोड्डी | Published: November 4, 2023 12:49 PM2023-11-04T12:49:26+5:302023-11-04T12:49:41+5:30

सोलापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कामगारांना किमान पंधरा टक्के बोनस देण्याची मागणी लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियनने केली आहे. ...

Fast to death in front of Yantramag Sangh office for 15 percent bonus | १५ टक्के बोनससाठी यंत्रमाग संघ कार्यालयासमोर आमरण उपोषण

१५ टक्के बोनससाठी यंत्रमाग संघ कार्यालयासमोर आमरण उपोषण

सोलापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कामगारांना किमान पंधरा टक्के बोनस देण्याची मागणी लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियनने केली आहे. यासाठी जिल्हा यंत्रमाग धारक संघ कार्यालयासमोर दोन यंत्रमाग कामगार आमरण उपोषणाला बसले आहेत. शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता यंत्रमाग कामगार लक्ष्मण माळी तसेच शहाबुद्दीन शेख यांनी उपोषणाला सुरूवात केली.

कामगारांच्या बोनससाठी लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनने मागच्या आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले. यंत्रमाग कारखानदार, कामगार संघटना प्रतिनिधी तसेच कामगार आयुक्तांची बैठक घेऊन पंधरा टक्के बोनस तोडगा काढण्याची विनंती सिटूने केली होती. याबाबत प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे, प्रशासन तसेच यंत्रमाग कारखानदार विरोधात आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती सिटूचे ॲड. अनिल वासम यांनी दिली.

Web Title: Fast to death in front of Yantramag Sangh office for 15 percent bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.