ऊस बिलासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:01+5:302021-06-17T04:16:01+5:30
सन २०२० - २१ सालचा गळीत हंगाम संपून सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरीही लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस ...
सन २०२० - २१ सालचा गळीत हंगाम संपून सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरीही लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी शुक्रवारी होणाऱ्या उपोषणात सहभागी होणार आहेत. सहकार आयुक्तांनी एफआरपीची रक्कम थकीत ठेवलेल्या साखर कारखान्यावर आरआरसी कारवाई केली आहे. रक्कम वसुलीसाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांना प्राधिकृत केले आहे.
---
३१ मे २०२१ रोजीच्या एफआरपी अहवालानुसार १०७.६५ कोटी थकीत रकमेपैकी ७२.८० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ३४.८५ कोटी देय आहे. याबाबत कारखान्यांना कळवले असून, आपण उपोषणाचा मार्ग न स्वीकारता कारखान्याशी संपर्क साधावा. याउपरही अनुचित प्रकार घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील.
- राजेंद्र दराडे, प्रादेशिक सहसंचालक, साखर