पंढरपूर तहसीलसमोर प्रकल्पग्रस्त कुुटुंबाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:22 AM2020-12-22T04:22:04+5:302020-12-22T04:22:04+5:30
प्रकल्पग्रस्त शेतकरी ज्योतिराम गोसावी व नामदेव गोसावी यांनी एप्रिल २०१३ साली गावठाणातील भूखंड क्र. १६६ मिळावा यासाठी अर्ज करून ...
प्रकल्पग्रस्त शेतकरी ज्योतिराम गोसावी व नामदेव गोसावी यांनी एप्रिल २०१३ साली गावठाणातील भूखंड क्र. १६६ मिळावा यासाठी अर्ज करून २ हजारांचे चलन क्र. ५९ भरले होते. त्यांना कागदपत्रे अपुरे असल्याचे कारण देऊन त्याची पूर्तता करण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र ८ वर्षांनंतर जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. म्हणून गोसावी कुटुंबाने उपोषण सुरू केले आहे.
कोट :::::::::::
प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या दुसऱ्या भूखंडावर अतिक्रमण आहे. ते काढण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आज पुन्हा नव्याने पत्र देऊन ते कढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- मोहिनी चव्हाण,
जिल्हा पुनर्वसन अधिकारी