मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 05:11 PM2024-06-18T17:11:05+5:302024-06-18T17:11:15+5:30

हा भीषण अपघात आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- कराड रोडवरील चिकमहुद जवळ ( बंडगरवाडी )पाटी येथे घडला.

Fatal accident on Pandharpur- Karad road; Six women died on the spot, one critically | मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर

मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर

सांगोला (अरूण लिगाडे): भरधाव वेगाने जाणाऱ्या १४ चाकी ट्रकने रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना उडवले. या अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा भीषण अपघात आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- कराड रोडवरील चिकमहुद जवळ ( बंडगरवाडी )पाटी येथे घडला.

दरम्यान, मृत व जखमी महिला कटफळ (ता. सांगोला) येथील रहिवासी आहेत. सात महिला मिळून मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर आल्या होत्या. दुपारी काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर - कराड रोडवरील (बंडगरवाडी) पाटी रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या असता पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडविल्याने हा भीषण अपघात घडला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: Fatal accident on Pandharpur- Karad road; Six women died on the spot, one critically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.