पावसाचं पाणी वळवल्याच्या कारणावरुन चिणकेत पिता-पुत्राला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:27 AM2021-09-12T04:27:16+5:302021-09-12T04:27:16+5:30
सांगोला : पावसाचे पाणी घराकडे वळवले आणि पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून पिता-पुत्रासह तिघांनी शेजा-यांच्या घरात घुसून दमदाटी ...
सांगोला : पावसाचे पाणी घराकडे वळवले आणि पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून पिता-पुत्रासह तिघांनी शेजा-यांच्या घरात घुसून दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी गजाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.
१० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास चिणके (ता. सांगोला) येथे ही घटना घडली.
याबाबत महादेव कृष्णा कोरे यांनी तानाजी गणपत कवठेकर, शिवाजी गणपत कवठेकर व जालिंदर सावंता कोरे यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
चिणके येथील महादेव कृष्णा कोरे व तानाजी गणपत कवठेकर हे शेजारी राहतात. पावसाचे पाणी महादेव कोरे यांच्या घरात येत असल्याने त्यांनी ते येऊ नये म्हणून रस्त्याकडेला वाट करून दिली होती. हे पाणी तानाजी कवठेकर यांच्या घरासमोर येत असल्याने त्यांनी ६ सप्टेंबर रोजी महादेव कोरे यांना मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली होती. त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांच्यासह कुटुंबातील लोक त्यांच्यावर चिडून होते.याच कारणावरून शुक्रवारी रात्री महादेव कोरे घरात असताना तानाजी कवठेकर, शिवाजी कवठेकर, जालिंदर कोरे यांनी घरात घुसून शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.