जेवणाचे बिल मागताच अंगावर मिरचीपूड टाकून पितापुत्राला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा 

By काशिनाथ वाघमारे | Published: July 22, 2023 07:03 PM2023-07-22T19:03:39+5:302023-07-22T19:03:53+5:30

जेवणाचे बिल न देता परस्पर निघून जाताना बिल मागितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन चौघांनी मिळून हॉटेल मालक पिता-पुत्रांना जबर मारहाण केली.

Father and son were beaten up by putting chilli powder on their bodies when they asked for the meal bill, crime against four | जेवणाचे बिल मागताच अंगावर मिरचीपूड टाकून पितापुत्राला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा 

जेवणाचे बिल मागताच अंगावर मिरचीपूड टाकून पितापुत्राला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा 

googlenewsNext

सोलापूर : जेवणाचे बिल न देता परस्पर निघून जाताना बिल मागितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन चौघांनी मिळून हॉटेल मालक पिता-पुत्रांना जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता हॉटेल मालकाच्या अंगावर मिरचीची पुड टाकून गल्ल्यातील रोख १४ हजार रुपये काढून घेतले. तसेच १० ते १२ साथिदारांनी काचेवर, शटर, आतील दारुच्या बाटल्यावरती दगड मारून पाच हजारांचे नुकसान केले.

शुक्रवार २१ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास सांगोला तालुक्यात सोनलवाडी येथे ही घटना घडली. याबाबत, हॉटेल मालक रमेश पवार (रा. बोंबेवाडी, ता. आटपाडी) यांनी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी आबा चव्हाण व सोन्या चव्हाण दोघेही (रा. सोनलवाडी), संभाजी बोडरे व सुरेश बोडरे (दोघेही रा. लोटेवाडी, ता. सांगोला) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी रमेश पवार यांनी सोनलवाडी येथे करारपत्राने चालविण्यासाठी घेतलेल्य हॉटेल व परमिट रूम बियर बारमध्ये ते स्वत: आणि त्यांचा मुलगा संदेश मिळून काम करतात. शुक्रवारी रात्री ८ वाजता वरील चौघेजण त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणाकरिता आले. त्यांनी देशी विदेशी मद्य प्राशन करून जेवण केले. 

त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास बिल न देता ते चौघेजण परस्पर हॉटेलमधून निघाले. रमेश पवार यांनी त्यांना आवाज देवून जेवणाचे २,८८० रुपये बिल मागितले. त्यावेळी संभाजी बोडरे यांनी तू मला कसले बिल मागतो, तुला हॉटेल चालवायचे का ? नाही म्हणत आबा चव्हाण , सोन्या चव्हाण व सुरेश बोडरे यांनी मारहाण केली. संभाजीने मिरचीची पूड त्यांच्या अंगावर टाकून मारहाण केली. तसेच हॉटेलच्या गल्ल्यातून १४ हजारांची रोकड काढून घेतली. त्यावेळी त्यांचा मुलगा संदेश पवार व जेवणासाठी आलेले लक्ष्मण चव्हाणसह इतरांनी भांडण सोडवले. काही वळेता त्या ठिकाणी आणखी १० ते १२ साथिदार आले. त्यांच्यापैकी संभाजीने..आता माझा भाऊ आला आहे, माग पैसे ? म्हणत पिता-पुत्रांना दगडाने मारहाण केली. तसेच साथिदारांनी हॉटेल समोरील बाजूस काचेवर शटर व आतील दारूच्या बाटल्यावर दगड मारु लागले. घाबरून पिता-पुत्रांनी हॉटेलचे शटर बंद करून आत थांबले.

Web Title: Father and son were beaten up by putting chilli powder on their bodies when they asked for the meal bill, crime against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.