कोरोना रुग्णसंख्येमुळे पत्नीला साडूच्या गावी जाऊ नको म्हटल्याने मुलाकडून वडिलांना बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:02+5:302021-07-14T04:26:02+5:30
ग आल्याने मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली. म्हसेवाडी (ता. करमाळा) येथे घडला आहे. याप्रकरणी मुलाविरुद्ध वडिलांनी पोलिसांत फिर्याद ...
ग आल्याने मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली. म्हसेवाडी (ता. करमाळा) येथे घडला आहे. याप्रकरणी मुलाविरुद्ध वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मुलाविरुद्ध रविवारी (ता. ११) गुन्हा नोंदला आहे.
यात संदिपान गोरख लोंखडे (वय ४५, व्यवसाय शेती, रा. म्हसेवाडी, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. पोलीस सूत्रानुसार फिर्यादीची ‘म्हसेवाडी शिवारात १५ एकर शेतजमीन असून, त्यावर कुटुंबाची उपजीविका चालते. रविवारी (११) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शेतातून फिर्यादी घरी आले तेव्हा खडकी येथील साडू संभाजी रूपनवर यांचा मोठा मुलगा पत्नीला खडकी (ता. करमाळा) येथे घेऊन जाण्यासाठी आला होता. परंतु तेथे कोरोनाचे पेशंट जास्त आहेत. तिला घेऊन जाऊ नको म्हणाल्याने मोठा मुलगा राजेश हा तेथेच होता. त्याने ‘तू कोण त्याला सांगणार’, असे म्हणून त्याने शिवीगाळ केली. लाथ मारून खाली पाडले. लोखंडी पाइपने मारून जखमी केले. परत आला तर ठार मारून टाकतो, अशी धमकीही दिल्याचे म्हटले आहे.
याप्रकरणी मुलगा राजेश संदिपान लोंखडे (रा. म्हसेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.