धक्कादायक! चिमुकलीसमोरच वडिलांनी आईला संपवलं अन् स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:11 IST2025-04-06T14:09:22+5:302025-04-06T14:11:41+5:30

वडिलांनी चार महिन्याच्या चिमुकलीसमोरच आईचा गळा दाबला.

Father kills mother in front of little girl and takes extreme step himself in karamala | धक्कादायक! चिमुकलीसमोरच वडिलांनी आईला संपवलं अन् स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! चिमुकलीसमोरच वडिलांनी आईला संपवलं अन् स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील कार्टी येथे पत्नीचा गळा दाबून हत्या करुन स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक म्हणजे स्वत:च्या चार महिन्याच्या चिमुकलीसमोरच त्यानी पत्नीचा गळा आवळला. 

मिळालेली माहिती अशी, कार्टी या गावातील युवराज लक्ष्मण शेरे (वय- ३१) तर पत्नीचे नाव रुपाली युवराज शेरे (वय- २५) अशी या पती पत्नीची नावे आहेत. गेल्या काही दिवसापासून पती युवराज शेरे हा कोणत्या तरी तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच तणावाखाली पत्नीसोबत वाद सुरू होते. यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. 

अंबरनाथमध्ये भाजपा माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवारीने हल्ला; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

युवराज शेरे हा  पत्नी ,आई, वडील,भाऊ, भावजय लहान मुलीसह कोर्टी येथील शेरे वस्तीमध्ये राहत होता. हत्या झाली त्यावेळी पती पत्नी हे दोघेच घरी होते. आधी पत्नीची गाळा दाबून हत्या केली, त्यानंतर स्वत: घराच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर बाहेर गेलेले कुटुंबीय घरात आल्यानंतर त्यांना चार महिन्याची चिमुकली रडत असल्याची दिसली. 

यावेळी वडिलांनी पाहिले तर सून एका कोपऱ्यात निपचित पडल्याचे दिसले. पुढे युवराजने एका अँगलला गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर वडिलांनी याची माहिती लगेच पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी कुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. 

Web Title: Father kills mother in front of little girl and takes extreme step himself in karamala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.