कोरोनाची भीती; ‘एचआयव्ही’ रूग्णांच्या तपासणीत ७३.३१ टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 02:19 PM2020-07-17T14:19:23+5:302020-07-17T14:22:17+5:30
२५ हजार ५६२ गर्भवतींची नियमित तपासणी सुरूच; संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना
सोलापूर : मागील काही वर्षांत ‘एचआयव्ही’ बद्दल जनजागृती झाल्याने अनेक जण स्वत:हून तपासणीसाठी एआरटी केंद्रावर जाऊ लागले़ त्यामुळे तपासणीचे प्रमाण वाढले होते; परंतु कोरोनामुळे अनेकांमध्ये भीती निर्माण झाली़ त्याचा विपरित परिणाम एचआयव्हीच्या तपासण्यांवरही झाला़ मागील तीन महिन्यात केवळ गर्भवतींच्या नियमित एचआयव्ही झाल्यात, तर स्वत:हून येणाºया रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे़ लॉकडाऊन काळातील तीन महिन्यात दिलेल्या उद्दिष्टापैकी १२,४८२ जणांची एचआयव्ही चाचणी झाली आहे़ अर्थात तपासणीत ७३़३१ टक्क्यांनी घट झाली आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या घटली आहे. एचआयव्ही तपासणीसाठी एआरटी सेंटरवर जाणाºयांमध्ये कोरोनाची भीती असल्याचे चित्र आहे़ त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते जून या कालावधीत एचआयव्ही तपासणीसाठी येणाºयांची संख्या खूपच कमी झाली आहे, शिवाय या वातावरणात सामूहिक जनजागृतीवरदेखील परिणाम झाल्याने अनेकांनी स्वत:हून एचआयव्ही तपासणी करण्यास टाळल्याचे वास्तव आहे़ एचआयव्ही तपासणीसाठी सोलापूर शिवाय लातूर, उस्मानाबाद, सांगली, विजापूर, हैदराबादमधून बहुतांश लोक सोलापुरात यायचे़ लॉकडाऊनच्या तीन महिन्यात ४०,२२४ लोकांच्या एचआयव्ही चाचणीचे उद्दिष्ट होते; मात्र कोरोनामुळे तपासणीसाठी येणाºयांचे प्रमाण घटले़ ट्रक चालक, फिमेल सेक्स वर्कर आणि मेल सेक्स वर्कर यांचीही संख्या घटली आहे.
अशातच एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातील नऊपैकी काही कर्मचारी हे कोविड उपक्रमाकडे तात्पुरते वळविण्यात आले आहेत़ या तीन महिन्यात गरोदर मातांच्या चाचणीचे उद्दिष्ट हे २०, ८०० होते; मात्र प्रतिसादामुळे गरोदर मातांच्या तपासणीचे प्रमाण २५,५६५ वर पोहोचले़
बाधितांना औषधे घरपोच
लॉकडाऊनमुळे बºयाच एचआयव्ही बाधितांना घराबाहेर पडता आले नाही़ ग्रामीण भागातून काही लोक सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात एआरटीच्या औषधांसाठी येत असताना रस्त्यामध्ये पोलिसांकडून अडवणूक झाली, काहींना काठीचा प्रसाद मिळाला़ परिणामत: मासिक उपचार आणि औषधे घेण्यासाठी येणाºयांची संख्याही घटली़ ते लोक धोकादायक अवस्थेत जगत आहेत़ त्यांना शासकीय रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी लॉकडाऊन काळात मुभा द्यावी अशी मागणी होत आहे़
शाळा, महाविद्यालयात आरोग्य यंत्रणेमार्फ त एचआयव्ही संदर्भात जनजागृती मोहीम राबविली जाते़ शिवाय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एचआयव्ही चाचण्या केल्या जातात; परंतु कोरोनाच्या फैलावामुळे या घटकांपर्यंत पोहोचता आले नाही; मात्र गावोगावी जाऊन चाचणी शिबिरे घेत आहोत़ मागील तीन महिन्यात लॉकडाऊनमुळे केवळ २६़.६९ टक्के लोकांच्याच एचआयव्ही चाचण्या करता आल्या.
- भगवान भुसारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग