भीती कोरोनाची... विद्यार्थ्यांची शाळांना दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:43 AM2020-12-05T04:43:12+5:302020-12-05T04:43:12+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या आठ महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद होती. शासनाने दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे ...
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या आठ महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद होती. शासनाने दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिक्षकांची कोरोना चाचणी, शाळांचे निर्जंतुकीकरण अशी सर्व तयारी शिक्षण विभागाने केली परंतु प्रत्यक्षात शाळांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत.
करमाळा तालुक्यात नववी ते बारावीपर्यंत एकूण ५५ शाळा आहेत. त्यातील ५४ शाळा सुरू झाल्या व नोबल इंग्लिश स्कूल ही एकमेव शाळा पालकांनी नकार दिल्याने सुरू झालेली नाही. या शाळातून १० हजार ५२ विद्यार्थी पटसंख्या असताना शाळेच्या पहिल्या आठवड्यात अवघे एक हजार विद्यार्थीच उपस्थित होते. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात आणखी दीड हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. तब्बल ७५ टक्के विद्यार्थी शाळेकडे कोरोनाच्या भीतीने फिरकतच नसल्याचे चित्र आहे.
----
करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयात नववी ते बारावीपर्यंतच्या १९ तुकड्या असून विद्यार्थ्यांची एकूण संख्या १ हजार ५१९ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० टक्केच विद्यार्थी शाळेत येत आहेत. शाळेत येताना विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य असून शाळेत प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल व ऑक्सिमीटरव्दारे तपासणी करण्यात येते.
- पी. ए. कापले, प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय करमाळा.
०२करमाळा-स्कूल
फोटो ओळी: करमाळ्यातील महात्मा गांधी विद्यालयात कोरोनाच्या पार्र्श्वभूमीवर मोजक्याच विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसत आहे.