गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:10+5:302021-05-07T04:23:10+5:30

शासनाने कोविशिल्ड लस टोचून घेणे अनिवार्य केल्यामुळे सध्या लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे लसींचा पुरवठा कमी ...

Fear of increased corona prevalence due to congestion | गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती

गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती

Next

शासनाने कोविशिल्ड लस टोचून घेणे अनिवार्य केल्यामुळे सध्या लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे लसींचा पुरवठा कमी असल्यामुळे या मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी कोविन ॲपवर ऑनलाइन नोंदणी केली. त्यांना पहिला डोस मिळाला. ज्यांनी पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत ते दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्रांवर हेलपाटे मारीत आहेत.

बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक विभागाकडून ३३८० डोस सांगोला शहर व ग्रामीण भागासाठी उपलब्ध झाले. त्यानुसार गुरुवारी ज्येष्ठ नागरिक, महिला व ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहाटे ४ वाजल्यापासून रांगा लावून नोंदणी केली. मात्र या ठिकाणी ऑनलाइन, ऑफलाइन नोंदणी व नोंदणी केलेले टोकन या बाबींमुळे लसीकरण विलंबाने सुरू झाले. पोलीस बंदोबस्तात दु. १२.३० वाजेपर्यंत १९० पैकी केवळ ३५ नागरिकांना डोस दिले होते.

कोट :::::::::::

जिल्हा शल्य चिकित्सालयाकडून प्राप्त झालेल्या ३६० डोसपैकी १९० दुसरे डोस, ६० पहिल्या डोससाठी तर उर्वरित डोस फ्रंटलाइनवर काम करणारे डॉक्टर, आरोग्य सेवक, शासकीय नोकरांना दिले जाणार आहेत. ऑनलाइन, ऑफलाइन नोंदणीचा गोंधळ उडाला होता. परंतु दुपारनंतर लसीकरण सुरळीत झाले.

- डॉ. उत्तम फुले,

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक,

ग्रामीण रुग्णालय सांगोला

फोटो ओळ :::::::::::::::::::::

सांगोला येथील लसीकरण केंद्रावर पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक, महिलांनी गर्दी केल्याचे छायाचित्र.

Web Title: Fear of increased corona prevalence due to congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.