चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरील कुटुंबाकडून पावणेदोन लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:37+5:302021-08-01T04:21:37+5:30

बार्शी : पाहुण्यांचा कार्यक्रम संपवून दुचाकीवरून पत्नीसह इंदापूरकडे (ता. बार्शी) येताना ...

Fearing a knife, he looted Rs 52 lakh from the family on the two-wheeler | चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरील कुटुंबाकडून पावणेदोन लाखांचा ऐवज लुटला

चाकूचा धाक दाखवून दुचाकीवरील कुटुंबाकडून पावणेदोन लाखांचा ऐवज लुटला

Next

बार्शी : पाहुण्यांचा कार्यक्रम संपवून दुचाकीवरून पत्नीसह इंदापूरकडे (ता. बार्शी) येताना पाठीमागून दोन दुचाकीस्वारांनी जबर धडक देऊन खाली पाडले. चाकूचा धाक दाखवून पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख असा १ लाख ७० हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. शुक्रवारी रात्री तांबेवाडी ते इंदापूर रोडवर ही घटना घडली.

याबाबत हनुमंत सुनील सोनवणे (२६, रा. इंदापूर) यांनी बार्शी तालुका पोलिसात तक्रार दिली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यात आरोपींनी महिलेच्या अंगावरील १ लाख २५ हजारांचे अडीच तोळ्याचे गठण, २८ हजारांची ७ ग्रॅमची कर्णफुले, १२ हजारांचे मंगळसूत्र व फिर्यादीच्या खिशातील रोख ३५०० रुपये असा पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी तांबेवाडी येथे (ता. भूम) पत्नी व मुलींसह दुचाकीवरून गेले होते. ते कार्यक्रम संपवून दुचाकीवरून रात्री इंदापूरकडे निघाले. २ किलोमीटर अंतरावर येताच पाठीमागून दोन दुचाकीस्वारांनी त्याना धडक दिल्याने पत्नीसह खाली पडताच धडक देणाऱ्यातील तिघांनी फिर्यादीला रस्त्याच्या कडेला चारीत ओढत नेऊन लथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड करताना गळ्याला चाकू लावून ओरडलास तर तुझ्यासह मुलीला, पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली व खिशातील साडेतीन हजारांची रोकड काढून अन्य तिघांनी दागिने हिसकावून पसार झाले.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रवीण जाधव व मदतनीस पोलीस पांडुरंग सगरे करीत आहेत.

Web Title: Fearing a knife, he looted Rs 52 lakh from the family on the two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.