शासकीय कमिट्यांसंदर्भात प्रतिक्रीया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:29+5:302021-06-24T04:16:29+5:30
- प्रा. पी. सी. झपके, ज्येष्ठ काँग्रेस नेते ============================== राज्यात ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी त्या पक्षाला ‘फॉर्मुल्या’नुसार शासकीय कमिट्यांमध्ये ...
- प्रा. पी. सी. झपके,
ज्येष्ठ काँग्रेस नेते
==============================
राज्यात ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी त्या पक्षाला ‘फॉर्मुल्या’नुसार शासकीय कमिट्यांमध्ये ६० टक्के वाटा तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेसला प्रत्येकी २० टक्के वाटा मिळणार आहे. त्यानुसार शिवसेनेला ६० टक्के वाटा मिळणार आहे तरीही राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे-पाटील यांच्यासमवेत चर्चा करून जागेबाबत निर्णय घेऊ.
- ॲड. शहाजीबापू पाटील
आमदार, सांगोला
===============================
राज्यात ज्या पक्षाचा लोकप्रतिनिधी त्या पक्षाला शासकीय कमिट्यांमध्ये ६० टक्के वाटा मिळणार आहे. फाॅर्मुल्यानुसार सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असल्यामुळे शासकीय कमिटीमध्ये त्यांना ६० टक्के वाटा मिळणार आहे तर राष्ट्रवादी व काँग्रेस (आय) पक्षाला २०-२० टक्के या फॉर्मुल्यानुसार काँग्रेसचा वाटा निश्चित आहेत.
- राजकुमार पवार
तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी
===================================
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये ठरलेल्या ‘फाॅर्म्युला’नुसार ज्या विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना ६० टक्के जागा तर उर्वरित ४० टक्क्यांमध्ये सरकारमध्ये सामील असलेल्या मित्रपक्षांना जागावाटपात स्थान मिळणार आहे.
- सूर्यकांत घाडगे
तालुकाप्रमुख, शिवसेना