बार्शीत गेलो की बराच होतो, ही रुग्णांची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:25 AM2021-09-24T04:25:39+5:302021-09-24T04:25:39+5:30
विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांचे वडील व माजी नगरसेविका श्रीमती सुशिला यांचे पती कै. हरिभाऊ बाबुराव अक्कलकोटे यांच्या ...
विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांचे वडील व माजी नगरसेविका श्रीमती सुशिला यांचे पती कै. हरिभाऊ बाबुराव अक्कलकोटे यांच्या पुण्यस्मरणदिनाचे औचित्य साधून श्री गणपती मंदिर देवस्थान सतरावा पुठ्ठा संस्थेला कार्डिॲक ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीप सोपल होते. यावेळी डॉ. बी. वाय. यादव, नंदन जगदाळे, डॉ. प्रशांत माेहिरे, डॉ. संजय अंधारे, डॉ. भरत गायकवाड, माजी नगराध्यक्ष मंगल शेळवणे, योगेश सोपल, गणेश जाधव, दगडू मांगडे, बाळासाहेब आडके, अरुणा परांजपे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. बोधले म्हणाले, कोरोनाचा काळ जगभरातील सर्वांनी अनुभवला आहे. या काळात भगवंताचे दर्शन बंद असले तरी तो हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या व आरोग्यसेवकांच्या माध्यमातून भगवंत प्रत्यक्ष उपस्थित राहून भयमुक्त करीत होता. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती जाणारच आहे. दु:खाला कुठेतरी अंत असला पाहिजे, अन्यथा तेही चिंतेचे कारण ठरते.
.................
बार्शीचा तीन जिल्ह्यांतील रुग्णांना आधार
कोरोनामुळे संपूर्ण देश बंद झाल्याच्या स्थितीत अनेक संस्था व संघटनांनी मदतकार्य केले. तज्ज्ञ डॉक्टर्सही ज्या काळात उपचाराला घाबरायचे, त्यावेळी डॉ. अंधारे यांनी धाडसाने पुढे येऊन उपचार सुरु केले व त्यानंतर इतरांनी योगदान दिले. कोरोनाबाबत अनेकांनी अनेक प्रकारची मते मांडली होती. बार्शीतील अनेक हॉस्पिटल्स व डॉक्टरांनी केलेल्या कार्यामुळे शेजारच्या दोन ते तीन जिल्ह्यातील रुग्णांना आधार मिळाला, असे गौरवोद्गार माजी मंत्री दिलीप सोपल यांनी काढले.
..................
फोटो ओळी
बार्शी येथील श्री गणपती मंदिर देवस्थान सतरावा पुठ्ठा संस्थेला कार्डिॲक ॲम्बुलन्सचे लोकार्पण करताना डॉ. जयवंत बोधले महाराज, माजी मंत्री दिलीप सोपल, डॉ. बी. वाय. यादव, नागेश अक्कलकोटे, नंदन जगदाळे, डॉ. प्रशांत माेहिरे, डॉ. संजय अंधारे आदी.
......
फोटो २३बार्शी अक्कलकोटे)
220921\04401752-img-20210922-wa0004.jpg
भगवंत नगरी ही आरोग्य पंढरी - डाॅ.जयवंत बाेधले महाराज
दरवर्षी असे विधायक उपक्रम करावेत
अक्कलकोटे परिवाराकडून कार्डिअॅक अॅम्बुलन्सचे लोकार्पण