पीकविम्याअभावी झोप उडाली; झोपा आंदोलनास गर्दी जमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:21 AM2021-03-26T04:21:52+5:302021-03-26T04:21:52+5:30
मागील आंदोलनात दहा दिवसात राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमा जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, परंतु अजूनही अनेक शेतकरी ...
मागील आंदोलनात दहा दिवसात राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमा जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, परंतु अजूनही अनेक शेतकरी वंचित आहेत. यामुळे गुरुवारी पुन्हा ठरल्याप्रमाणे हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर क्लेमप्रमाणे पैसे जमा केल्याचे मेसेज येत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरू राहणार असल्याचे शंकर गायकवाड यांनी स्पष्ट केले.
यावेळी दयानंद चौधरी, गोटू पाटील, अरविंद चौधरी, बजरंग चौधरी, नितीन कदम, बाजीराव चौधरी, श्रीहरी गायकवाड, सिध्दार्थ चौधरी, समाधान आगलावे, अखबर शेख, राजाभाऊ कदम, अतुल गरड, गोपाळ पाडुळे, अतुल भोस्कर, तानाजी उकिरडे, पांडुरंग घेमाड, प्रवीण घेमाड, हनुमंत राऊत, दत्ता भोगे, विनायक घोडके, ज्ञानेश्वर पाटील, लालासाहेब गायकवाड, दत्तात्रय पाटील, संतोष गुंड, ऋषिकेश गायकवाड, चंद्रहास गायकवाड, दीपक गायकवाड आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
------
७० शेतकऱ्यांचा सहभाग
सकाळी विमा कंपनीच्या कार्यालयात सुरू केलेले हे झोपा आंदोलन रात्रीही सुरूच होते. आंदोलनकर्त्यांना कंपनी प्रशासनाने आंदोलन थांबवण्याची विनंती केली. मात्र ती मान्य केली नाही. या आंदोलनात बार्शी तालुक्यासह अन्य भागातील ७० शेतकरी सहभागी झाले आहेत.
दोन दिवस पुरेल एवढा डबा
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घरून निघतानाच दोन दिवस पुरेल इतके जेवणाचे आणले आहेत. आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही माघे हटणार नाही असे शंकर गायकवाड यांनी सांगितले. तसेच अद्याप शासनाचा कोणताही प्रतिनिधी आमची चौकशी करायला देखील आला नसल्याचे गायकवाड म्हणाले.
२५बार्शी-आंदोलन
भारती एक्सा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात झोपून आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी.