वृक्षतोड करणं क्रिडाधिकाऱ्याला भोवले; सोलापूर महापालिकेने ठोठावला पाच लाखांचा दंड

By Appasaheb.patil | Published: March 23, 2023 07:03 PM2023-03-23T19:03:46+5:302023-03-23T19:04:00+5:30

दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Felling of trees was done to the sports official; Solapur Municipal Corporation imposed a fine of five lakhs | वृक्षतोड करणं क्रिडाधिकाऱ्याला भोवले; सोलापूर महापालिकेने ठोठावला पाच लाखांचा दंड

वृक्षतोड करणं क्रिडाधिकाऱ्याला भोवले; सोलापूर महापालिकेने ठोठावला पाच लाखांचा दंड

googlenewsNext

सोलापूर : शहरातील नेहरुनगर येथील शासकीय मैदानावर असलेली ५ झाडे महापालिकेची परवानगी न घेता तोडल्याबद्दल पंढरपुर तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांना प्रति वृक्ष एक लाख रुपये यानुसार पाच लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत महापालिका प्रशासनाने दिली आहे.

वृक्ष तोडीची ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. त्यावेळी जाधव यांच्याकडे नेहरुनगरच्या मैदानाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे बेकायदा झाडे तोडल्याबद्दलची जबाबदारी जिल्हा क्रीडा कार्यालयाने जाधव यांच्यावर निश्चित केली. त्यानंतर दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिकेने काढले आहेत.

नेहरुनगरच्या शासकीय मैदानावर झालेली बेकायदा व्रुक्षतोडीचा प्रकार गंभीर आहे. 

Web Title: Felling of trees was done to the sports official; Solapur Municipal Corporation imposed a fine of five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.