कळमण, भागाईवाडी, दारफळमध्ये खताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:16+5:302021-06-21T04:16:16+5:30
कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण, साखरेवाडी, दारफळमध्ये डीएपी खते आणि सोयाबीनसह काही बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही ...
कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण, साखरेवाडी, दारफळमध्ये डीएपी खते आणि सोयाबीनसह काही बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही खते आणि सोयाबीनचा शासनाने पुरवठा करण्याचा मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील आठवडाभरात उत्तर सोलापूर तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाला. आता पावसाने ओढ दिली आहे. काही गावात पेरणीलायक पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी अद्याप पेरणीलायक पाऊस झालेला नाही. याच काळात सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
काही दुकानदारांकडून मागेल ते बियाणे देण्याऐवजी इतर कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.
---
बाजारात चढ्या दराने खते, बियाणे विक्रीचा प्रयत्न आहे. अनेक दुकानदारांनी खते आणि बियाणांचा साठा करून ठेवला आहे. हा साठा बाहेर काढून तो शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दारात वितरित करावा.
- बापू पवार
शेतकरी, कळमण